Premium|O P Nayyar and Lata Mangeshkar professional rivalry : ओ. पी. नय्यर आणि लतादीदी; २० वर्षे 'न जुळलेल्या सुरांची' एक अजब दास्तान!

Legendary music directors : संगीतकार ओ. पी. नय्यर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यातील व्यावसायिक दुरावा आणि त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या न जुळलेल्या सुरांची ऐतिहासिक आठवण.
O P Nayyar and Lata Mangeshkar professional rivalry

O P Nayyar and Lata Mangeshkar professional rivalry

esakal

Updated on

ओ. पी. नय्यर आणि लता मंगेशकर म्हणजे आपापल्या क्षेत्रांतील नावाजलेली नावे. भारतीय चित्रपटसृष्टीत दोघांचे योगदान फार मोलाचे आहे; पण आपल्या कारकिर्दीत दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही. तो योग जुळून आलाच नाही. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीची सांगता १६ जानेवारीला होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आणि दीदींच्या न जुळलेल्या सुरांची आठवण...

उभ्या आयुष्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा स्वर न वापरता तब्बल २० वर्षे संगीताच्या दुनियेत ताठ मानेने जगलेले संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर अर्थात ओपी यांच्या जन्मशताब्दीची सांगता येत्या १६ जानेवारीला होत आहे. ओ. पी. नय्यर यांच्या संगीतात एक ‘ ऱ्हिदम’  होता,  एक ठेका होता , जोश होता , उल्हास   होता,  उत्साह होता. भन्नाट बेदरकारपणा त्यांच्या रक्तातच मुरला होता. आपल्या मूल्यांवर ते अटळ आणि अढळ होते. भारतीय चित्रपटसृष्टीत ओ. पी. नय्यर यांचे योगदान खूप मोठे आहे. आज ओपी आणि लता दोघेही आपल्यात नाहीत; पण त्यांच्या न जुळलेल्या सुराची चर्चा संगीतप्रेमी रसिकांमध्ये आजही होत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com