Premium|Study Room : महासागराचे आम्लीकरण म्हणजे काय? कारणे, परिणाम आणि उपाय

Ocean Acidification : वातावरणातील वाढता कार्बन डायऑक्साइड महासागर शोषून घेत असल्याने समुद्राच्या पाण्याची आम्लता वाढत आहे. याचा प्रवाळ, शिंपले, समुद्री अर्चिन आणि प्लँक्टनवर परिणाम होतो.
Ocean Acidification

Ocean Acidification

esakal

Updated on: 

लेखक - सागर रेपाळे

महासागराचे आम्लीकरण म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO₂) महासागरात शोषला गेल्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या pH मध्ये होणारी हळूहळू घट होय. मानवी क्रियांमुळे, विशेषतः जीवाश्म इंधनांचे ज्वलन, जंगलतोड आणि औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील CO₂ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औद्योगिकपूर्व काळापासून वातावरणातील CO₂ चे प्रमाण २८० ppm वरून जवळपास ४०० ppm झाले आहे. महासागर वातावरणातील सुमारे २५–३०% CO₂ शोषून घेतात, त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा वेग कमी करण्यास मदत होते; परंतु यामुळे महासागराचे आम्लीकरण वाढते. औद्योगिक क्रांतीपासून समुद्राच्या पृष्ठभागाचा pH ०.१ युनिटने घटला असून आम्लतेत सुमारे ३०% वाढ झाली आहे.

CO₂ समुद्राच्या पाण्यात विरघळल्यावर कार्बोनिक आम्ल (H₂CO₃) तयार होते. त्याचे विघटन होऊन हायड्रोजन आयन (H⁺) वाढतात आणि कार्बोनेट आयन (CO₃²⁻) कमी होतात. त्यामुळे समुद्राचे पाणी अधिक आम्लीय बनते आणि प्रवाळ, शिंपले, क्लॅम्स, समुद्री अर्चिन आणि काही प्लँक्टन यांसारख्या कवच किंवा सांगाडा तयार करणाऱ्या जीवांना अडचणी निर्माण होतात. महासागराच्या आम्लीकरणामध्ये नैसर्गिक सेंद्रिय पदार्थांचे विघटन, समुद्रतळावरील रासायनिक अभिक्रिया, कचरा विल्हेवाट आणि युट्रोफिकेशन यांचाही सहभाग असतो. युट्रोफिकेशनमुळे प्लँक्टनची मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि त्यांच्या विघटनामुळे ऑक्सिजन कमी होऊन CO₂ वाढतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com