
स्मृती सागरिका कानुनगो
ओडिशा सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये ११.२५ टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच या निर्णयाने या राज्यात मोठे राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण केले आहे. राज्यातील शासकीय व अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये हे आरक्षण लागू करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली असली, तरी वैद्यकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक आणि व्यवस्थापन यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.