
मोतिलाल चंदनशिवे
भारताच्या संसदीय इतिहासात संयुक्त संसदीय समित्यांनी स्पृहणीय कार्य केल्याचे उदाहरण अपवादात्मक असेल. सरकार व लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्त्व निश्चित करण्यासाठी उपयुक्त असणा-या या समित्यांचा उपयोग सरकारविरोधातील टीकेची धार कमी करण्यासाठी केला जातो. या समित्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.