
अलीकडे कामगार क्षेत्रात बनावट अर्थात डमी माथाडी कामगारांची संख्या वाढली आहे. त्यांच्याकडून दहशत निर्माण होत असल्याच्या तक्रारी सर्वपक्षीय आमदारांनी केल्या आहेत. त्यांच्यामुळे खऱ्याखुऱ्या माथाडींवर अन्याय होत असून, उद्योग, व्यावसायिक यांच्यात भीतीचे वातावरण आहे. कायद्याच्या आधाराने त्यांची ही दहशत मोडून, प्रामाणिक माथाडी कामगारांना आणि उद्योग-व्यावसायिकांना न्याय देण्याची भूमिका घेण्यास आपले प्राधान्य राहील, अशी रोखठोक भूमिका कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी घेतली. मंत्री फुंडकर यांच्याशी सरकारनामाचे विशेष प्रतिनिधी सदानंद पाटील यांनी साधलेला विशेष संवाद....