Premium|Only Child Generation : डायनासोरसारखी लोप पावणारी नाती..!

Changing Family Relationships : एकुलत्या एक अपत्यांच्या वाढत्या संस्कृतीमुळे संयुक्त कुटुंबातील नाती विरळ होत आहेत. बदलत्या जीवनशैलीत हरवत चाललेल्या नातेसंबंधांचा हा आत्मपरीक्षण करणारा भावनिक प्रवास आहे.
Only Child Generation

Only Child Generation

esakal

Updated on

सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com

माझी पिढी ‘ओन्ली वन चाईल्ड’ प्रणालीवर आल्यामुळे नातीच स्वाभाविकपणे आकुंचन पावत चालली आहेत. त्याची जाणीव होईपर्यंत, नात्यांचा ओलावाच पुसून टाकला ना आपण? एकदा हा प्रश्न मुळांच्या दिशेने वाटचाल करताना विचारून पाहायला हवा आपण सगळ्यांनीच.

माझ्या बाबांना सात सख्खे काका. सख्ख्या दोन आत्या. बाबा सांगतात, की दोन सावत्र काकाही होते.

मला तीन सख्खे काका. एक सख्खी आत्या.

सक्षमला (माझ्या मुलाला) दोन सख्ख्या आत्या. सख्खा काका एकही नाही.

तसे मला चुलत काका भरपूर आहेत. नऊ आजोबा असल्यामुळे आमची सगळीच नऊच्या नऊ कुटुंबं बऱ्यापैकी मोठी. चुलत आत्या-बित्याही खूप. इतक्या, की नावंही माहीत नाही मला. हे सगळेच जण कधीतरी लग्नात वगैरे भेटतात.

‘काय मग ओळखलं का’, ‘एवढुसा होता, आता केवढा झालाय...’ हे टिपकल प्रश्न तेव्हा ते विचारतात.

माझ्या तोंडावर खोटं खोटं हसू आणि मग खोटा खोटाच आपुलकीचा प्रश्न..., ‘काय म्हणता, कसे आहात’, ‘बरे आहात ना...’, ‘आता कुठं राहायला’, ‘ती इथली खोली काय केली?’, ‘किती वर्षं राहिली रिटायरमेन्टला’ हे काही कॉमन प्रश्न मी पाठ केलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com