Premium| Indian Airstrike 2025: भारताच्या कूटनीतीचा विजय

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने नियोजनबद्ध एअरस्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 'ऑपरेशन सिंदूर' ही भारताच्या कूटनीतीची ऐतिहासिक विजयगाथा ठरली
Operation Sindoor
Operation Sindooresakal
Updated on

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

पहलगाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्याला भारत प्रत्युत्तर कधी देणार, या प्रश्नाचे सात मे रोजी पहाटे देशाला मिळाले. भारताने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, सुमारे शंभरहून अधिक दहशतवादी यामध्ये मारले गेले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ असे अत्यंत मार्मिक नाव देऊन आखण्यात आलेले हे मिशन अत्यंत नियोजनबद्धरीत्या यशस्वी करण्यात आले. हा भारताने केलेला हल्ला नसून, तो ‘प्रिएम्प्टिव्ह अ‍ॅटॅक’ आहे आणि याला आंतरराष्ट्रीय कायद्यांची संमती आहे. भारताच्या कूटनीतीचा हा विजय आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून भारत कधी, केव्हा आणि कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार, असा प्रश्न विचारला जात होता. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्यामुळे भारताने गेल्या १५ दिवसांमध्ये राजनयाच्या आणि कूटनीतीच्या पातळीवर अनेक पावले उचलली. सिंधू नदीपाणीवाटप कराराला स्थगिती देणे, किशनगंगा नदीचे पाणी अडवणे, पाकिस्तानची व्यापारी कोंडी यांसारखे काही महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्याचबरोबर भारतीय लष्कराला या दहशतवादी हल्ल्यानंतरची कारवाई करण्यासाठी पूर्णतः ‘फ्री हँड’ म्हणजेच मोकळीक देण्यात आल्याचे खुद्द पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितले होते. दुसरीकडे, १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये ‘मॉक ड्रील’ करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्या दृष्टीने तयारीही सुरू झाली होती. ७ मे २०२५ च्या सकाळी तमाम भारतीयांना पाकिस्तानवर जबरदस्त एअरस्ट्राइक करत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची सुवार्ता दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com