
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्याचं भारताने चोख उत्तर दिलं आहे. वेगवेगळ्या सात शहरांमधील नऊ दहशतवादी ठाण्यांवर हल्ला करण्यासाठी भारताने मिसाईल स्ट्राईकचा उपयोग केला. या स्ट्राईक मध्ये २४ मिसाईलचा वापर करत १०० हुन अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. या हल्ल्यात मिसाईल स्ट्राईकचाच उपयोग का करण्यात आला? वापरण्यात आलेल्या या शस्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत? बालाकोट एअरस्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक आणि या मिसाईल स्ट्राईक यांमध्ये काय फरक आहे? या विषयी जाणून घेवूया सकाळ प्लसच्या विशेष लेखातून
२२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची योजना आखली. सिंदूर हे नाव पहलगाम हल्ल्यात ज्या स्त्रियांच्या कुंकवाला धक्का पोहचला म्हणजेच ज्या स्त्रीयांना आपला जीवनसाथी गमवावा लागला त्यांना समर्पित करण्यात आलं आहे. या ऑपरेशन सिंदूरमध्ये SCALP क्रूझ मिसाईल, HAMMER बॉम्ब आणि Loitering Munitions (विशिष्ट प्रकारचे ड्रोन) या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे.