
मुंबई: प्राजक्ता परवा अचानक माजी विद्यार्थी मेळाव्यात भेटली, बोलता बोलता गप्पा रंगल्या. इतके दिवस कुठे गायब ही होतीस? या माझ्या सहज प्रश्नाने मात्र तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिला काहीतरी दीर्घकाळ ट्रिटमेंट घ्यावी लागणारा हाडांचा त्रास तिला होत होता. त्यावेळी मला तिच्या अचानक नोकरी सोडण्यामागचे कारण लक्षात आले. ती सांगत होती सध्या तिच्या दुखण्याचा बराचसा भाग कमी झाला आहे, तरीही ट्रिटमेंट मात्र घ्यावी लागणार आहेच. इतके दिवस आजारपणात घालवल्यावर तिच्या मनाची देखील फारशी बरी अवस्था नव्हती हे जाणवत होतंच.. पण या सगळ्यातून तिला बाहेर पडायचे आहे. सध्या ती स्वतःसाठी पार्ट टाइम नोकरीच्या शोधात आहे. पण त्या दिवशी जाणवलं कुठे गायब.. दिसत नाहीस हल्ली.. काय ग तू नोकरी सोडली का? सध्या काय करते आहेस? अशा अनेकांच्या प्रश्नाना उत्तरं देऊन थकली होती..