

Musadik Malik India Visit
esakal
पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. मे २०२३ नंतर पाकिस्तानचा एखादा मंत्री पहिल्यांदाच भारतात आलेअसल्याने या दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने केलेली ऑपरेशन सिंदूरची कारवाई आणि सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय यामुळे दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढला आहे. त्यातच सिंधू जल कराराबाबत आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेला निर्णय आणि त्यावर भारताने घेतलेली भूमिका यामुळे पाण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. एकीकडे पाकिस्तानला जुनाच करार पुन्हा लागू व्हावा असं वाटतंय, तर दुसरीकडे भारताने लवादाचा अधिकारच नाकारला आहे. पण या दौऱ्याचा या वादाशी नेमका काय संबंध आहे? मलिक यांचा भारतात येण्यामागचा उद्देश काय आहे? आणि पाण्याचा हा संघर्ष पुढे कोणतं वळण घेऊ शकतो?