
सुनील चावके
संसदेतील आपण केलेल्या पहिल्या भाषणापेक्षा प्रियांकांचे भाषण खूपच सरस ठरल्याचे प्रामाणिक कौतुक सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केले. या कौतुकातून राहुल-प्रियांका यांच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचे दिसत असले तरी आज ना उद्या सरस कामगिरी बजावण्याचे स्पर्धात्मक दडपण राहुल गांधींवर येणार आहे.