
कल्याणी शंकर
यंदाची अठरावी लोकसभा अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लोकसभेला दशकानंतर पहिल्यांदाच मजबूत असा विरोधी पक्ष लाभला आहे. मात्र संसदेत व संसदेच्या बाहेर विविध राजकीय पक्षांमधील कटुता वाढत चालली आहे.
कोणताही पक्ष समजुतीने घ्यायला तयार नाही. खरे पाहता लोकशाहीत शिस्त, शिष्टाचार आणि संसदेच्या प्रतिष्ठेला अनन्यसाधारण महत्व असते. संसदीय सुधारणांची गरज पूर्वीपेक्षा आता अधिक स्पष्टपणे भासत आहे. तसेच या सुधारणा तातडीने अंमलात आणण्यासाठी प्रत्यक्ष कृतीचीही तेवढीत तातडीने गरज आहे.
संसदेच्या यंदाच्या अधिवेशनातील उत्पादकता अर्थात प्रत्यक्ष कामकाजाची टक्केवारी यंदा केवळ ५२ टक्के अशी नीचांकी अशी नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच संसदेच्या कामकाजाचा अर्धा वेळ विविध कारणास्तव वाया गेलेला आहे.