pregnancy problems because of food
Esakal
पुणे - मी एरव्ही हॉटेलात गेले की कधीही चायनीज खायचे नाही. त्याचा वासही मला सहन होत नव्हता. मी चव घेण्यापलिकडे कधीही चायनीज खाल्लं नाही. पण प्रेग्नंसीमध्ये मला असं काय झालं माहिती नाही. मला फक्त चायनीज खावसं वाटत होतं. कदाचित हे सायकॉलॉजिकल असेल.. माहिती नाही. पण मला खूप खावसं वाटत होतं हे नक्की. त्यानुसार मी बरंच चायनीज खाल्लं.. पण ही गोष्ट जेव्हा माझ्या डॉक्टरांना समजली त्यावेळी मात्र त्यांनी मला थांबवलं. एखाद दुसऱ्या वेळी हे ठीक आहे पण प्रत्येकच वेळी खाऊ नकोस, चायनीज खाण्यात अनेकदा प्रिजर्वेटीव्हज आणि कलर असतात. त्यामुळे ते खाण्याने बाळावर परिणाम होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं असल्याचं रिमा सांगत होती.
आई झाल्यावर आपल्याला हे खाऊ नको ते खाऊ नकोचे सल्ले मिळतातच. पण त्याही आधी आई जे अन्न खाते त्याचाही बाळावर परिणाम होतो असं विज्ञान सांगतं. हे केवळ आई होताना नाही तर त्याआधीही आई काय खाते आणि काय नाही याचा तिच्या आणि पर्यायाने होणाऱ्या बाळावरही परिणाम होत असतो.
या विषयात अनेक संशोधनं झाली आहेत, यामध्ये आई जे जंक फूड खाते त्यामुळे बाळाच्या डिएनएवर काही परिणाम होतो का, आईच्या खाण्याचा मुलाच्या लठ्ठपणाशी संबंध असतो का, तसेच हल्ली महिलांमध्ये जे पीसीओडी आणि पीसीओएसच्या तक्रारी वाढल्यात, वंध्यत्वाच्या तक्रारी वाढल्यात त्याचा आपल्या खाण्याशी काही संबंध आहे का? तो संबंध असेलच तर तो कसा असतो, त्यामुळे काय अडचणी येतात, डॉक्टर याविषयी काय म्हणतात असं सगळं आपण या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.