

peer review transparency
esakal
विज्ञानात एक प्रकारचा वंशवाद आणि वसाहतवाद पोसला जात आहे आणि गोपनीयता हा त्याचा पाया आहे, अशी टीका वाढत्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात पारदर्शकतेची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
निव्वळ परंपरेने रुजलेल्या प्रथांना जेवढं महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आहे, तितकंच विज्ञानातही आहे. अमेरिकेत गेल्याच आठवड्यात घडलेल्या एका घटनेने अशा एका प्रथेला आव्हान दिले गेले आहे. ती प्रथा आहे विज्ञान नियतकालिकात एखादा शोधनिबंध छापण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या गोपनीय परीक्षणाची म्हणजे ‘पिअर रिव्ह्यू’ची. रॅँड पॉल या सिनेटरने सायन्स आणि इतर काही नियतकालिकांच्या संपादकांना पत्र लिहून एका संदर्भातली गोपनीय परीक्षणे आणि ई-मेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याला संदर्भ आहे कोविडच्या विषाणूच्या उगमासंबंधी. हा विषय पूर्वीच खूप चावून चघळून त्यातून स्पष्ट काही निघालेलं नाही आणि निघण्याची शक्यताही फारशी दिसतं नाही. पण त्यानिमित्ताने ‘पिअर रिव्ह्यू’च्या गोपनीयतेला जे आव्हान दिलं गेलं आहे, त्याचे संशोधन क्षेत्रावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.