
हिमालय पर्वतरांगांबद्दल आपण सर्वच खूप अभिमान बाळगतो. भारताच्या उत्तर भागातील ही पर्वतरांग केवळ उंच बर्फाच्छादित शिखरांमुळे प्रसिद्ध नाही, तर तिथली हवा, नद्या, वनसंपदा, जैवविविधता आणि तिथलं अप्रतिम निसर्गसौंदर्य यामुळे ती जगातील एक अनोखी परिसंस्था मानली जाते. अगदी वर्षभर देशोदेशींचे पर्यटक इथे भेट देतात. मात्र, या सुंदर पर्वतश्रेणीसमोर आता एक मोठं संकट उभं ठाकलं आहे – प्लास्टिकचा वाढता कचरा. हा विषय नेमका काय, तो समोर कसा आला आणि त्या संदर्भातले उपाय कोणते? समजून घेऊ सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून...