

Maharashtra Municipal Election Analysis
esakal
नगर परिषदा-नगर पंचायतींच्या निवडणुकीनंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या प्रचारामध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्येच संघर्ष दिसून आला. निवडणूक जवळ आली की मित्रपक्षांमधील मतभेद वाढतात आणि निकालानंतर नवी समीकरणे तयार होतात. महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिर युतीपेक्षा बदलती आघाडी हीच स्थायी बाब ठरत आहे, असेच सध्याच्या परिस्थितीवरून वाटते.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर उभय नेत्यांमध्ये आगामी महापालिका निवडणूक युती करून लढण्याबाबत दोन तास चर्चा झाली, असे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, याबाबत स्थानिक पातळीवरील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष प्रभारी दर्जाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चर्चा करण्याची मुभा दिल्याचे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी सांगितले आणि इथेच ‘ग्यानबाची मेख’ आहे.