Premium|Prabhakar Kolte Abstract Art : प्रभाकर कोलते यांच्या रंग, अवकाश आणि आत्मशोधाच्या कलाप्रवासाचा मुंबईत नवा आविष्कार

Prabhakar Kolte Art Exhibition : ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या प्रदीर्घ कलासाधनेतून भारतीय अमूर्त कलेला स्वतंत्र दृश्यभाषा मिळाली असून, मुंबईतील एकल प्रदर्शन त्यांच्या रंग, अवकाश आणि आत्मशोधाच्या कलाप्रवासाचा नवा टप्पा ठरला आहे.
Prabhakar Kolte Abstract Art

Prabhakar Kolte Abstract Art

esakal

Updated on

अरविंद हाटे

भारतीय अमूर्त कलेला स्वतंत्र दृश्यभाषा देणारे ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांचा कलाप्रवास म्हणजे रंग, अवकाश आणि आत्मशोधाचा अखंड प्रवास. सध्या मुंबईत भरलेले कोलते यांच्या चित्राचे एकल प्रदर्शन त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेचा नवा टप्पा ठरते.

मी पाहून चित्र काढत नाही; चित्र काढतो आणि मग पाहतो ः प्रभाकर कोलते

भारतीय अमूर्त कलेला स्वतंत्र दृश्यभाषा आणि चिंतनशील आशय प्राप्त करून देणाऱ्या अग्रगण्य चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलते यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. वासुदेव गायतोंडे, अंबादास, एस. एच. रझा, अकबर पदमसी आणि प्रभाकर बरवे यांच्यासारख्या दिग्गज अमूर्त चित्रकारांच्या परंपरेत त्यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक कलेचा शोध हा पाश्चात्त्य प्रभावाची नक्कल करण्यासाठी नव्हे; तर भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म, निसर्गानुभूती आणि सांस्कृतिक स्मृती यांच्या आधारे स्वतंत्र कलाभाषा निर्माण करण्यासाठी सुरू झाला. या प्रवाहाला दिशा देणाऱ्या कलाकारांमध्ये प्रभाकर कोलते यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

१९४६ मध्ये महाराष्ट्रातील नेरूरपार येथे जन्मलेल्या प्रभाकर कोलते यांनी १९६८ मध्ये मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९७२ ते १९९४ या कालावधीत त्यांनी याच संस्थेत अध्यापन केले. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ चित्रकलेचे तंत्र शिकवले नाही; तर कला समजून घेण्याची, स्वतःचा विचार विकसित करण्याची आणि स्वतंत्र अभिव्यक्ती शोधण्याची दृष्टी दिली. वर्गाच्या चौकटीबाहेर जाऊन जगाकडे पाहण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या मते, कला शिक्षक हा केवळ अध्यापक नसून सतत साधना करणारा चित्रकार, जिज्ञासू वाचक आणि संवेदनशील लेखक असला पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी पुढे भारतीय समकालीन कलेतील महत्त्वाचे कलाकार बनले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com