
सुलभा तेरणीकर
saptrang@esakal.com
अ खेर ‘प्रभात’चा तारा अस्ताला गेलाच. स्वतःच्या भांडवलावर आणि स्वतःच्या स्टुडिओमध्ये निर्माण केलेल्या फिल्म्सची- त्यांच्या निगेटिव्हची प्राणपणाने केलेली देखभाल यामुळे त्याची गुणवत्ता तशीच टिकून राहिली. ते ‘प्रभात’चं वैशिष्ट्य सांगता येईल. पहिल्यांदा वितरक आणि नंतर भागीदार म्हणून बाबूराव पै यांनी प्रभातचित्र लहान गावापासून परदेशात प्रदर्शित केली. बाबूराव पै यांचे अनेक चित्रपटगृहांशी सलोख्याचे संबंध होते.
‘प्रभात’ बोलपटाच्या पहिल्या नायिका दुर्गा खोटे लिहितात, ‘प्रभातच्या आवारात गेल्यापासून एका वेगळ्या विश्वात वावरल्यासारखे वाटत असे. तिथे ध्यास, चिंतन, मनन, अभ्यास होता... झगमगाट मुळीच नव्हता. जिद्द होती. कष्ट होते. प्रभातकारांना ‘प्रभात’शिवाय दुसरे जीवन नव्हते. माझ्या कलाजीवनाचा पाया इथेच रचना गेला...’