

Prahasrang Europe Travelogue
esakal
महेंद्र सुके-mahendra.suke@gmail.com
डॉ. श्वेता चिटणीस यांचे ‘प्रवासरंग’ हे मॅजेस्टिकने प्रकाशित केलेले पुस्तक केवळ युरोपभ्रमंतीचे वर्णन नसून, ते अनुभव, विचार, साहित्य आणि संवेदना यांचा सुंदर संगम आहे. डॉ. श्वेता म्हणतात, त्याप्रमाणे ‘वस्तू विकत घेण्यापेक्षा अनुभव विकत घेतले तर आयुष्य सुंदर होते.’ युरोपातील हा प्रवासाचा अनुभव वाचकांना खरेच थक्क करणारा आहे.
प्रवास केवळ भौगोलिक बदल नसतो; तो अनुभवांचा, संवेदनांचा आणि विचारांचा आत्मसंवाद असतो. काही प्रवास आठवणींच्या कप्प्यात साठून राहतात; तर काही लेखणीच्या माध्यमातून शब्दरूप घेतात. डॉ. श्वेता चिटणीस लिखित ‘प्रवासरंग’ हे असेच एक अनुभवसमृद्ध पुस्तक आहे, ज्यात युरोपातील विविध देश, शहरे, कला, संस्कृती आणि निसर्ग यांचे रंगीबेरंगी दर्शन घडते.