
किरण कवडे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये खरिपाची पेरणी जोमात सुरू झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळा असाह्य होत असताना मेमध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल महिनाभर पावसाने दमदार हजेरी लावली.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील १२ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. यात कांदा, मका, बाजरी, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या पावसामुळे टँकरपासून सुटका मिळाली आणि दुष्काळाची तीव्रता घटली. मॉन्सूनपूर्व पावसाने नुकसान केले. पण त्याचबरोबर खरिपाच्या पेरणीलाही चालना दिली.