मराठमोळी साधीसुदी काकी!

Ashwini Kulkarni Controversy Role in Varan Bhat Loncha
Ashwini Kulkarni Controversy Role in Varan Bhat Loncha
Summary

पुण्याची मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने "नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा" या चित्रपटात काकीची आव्हानात्मक भूमिका केल्यामुळे चर्चेत आली. मात्र, अश्विनी अगदी साधीसुदी असून ती प्रत्येक भूमिकेवर जिवापाड प्रेम करते; त्यामुळेच ती भूमिका हीट होते.

"नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा" या चित्रपटात मला महेश मांजरेकर यांच्यामुळेच काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून प्रेक्षकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र फक्त ट्रेलरवरून प्रेक्षकांनी लगेचच वाईट प्रतिक्रिया देणे योग्य नाही. त्यासाठी थोडेसे पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पहावा अन त्यानंतरच प्रतिक्रिया द्यावी, असे सांगून अश्विनीने आपला आतापर्यंतचा प्रवास उलगडला. (Ashwini Kulkarni Controversy Role in Varan Bhat Loncha)

विविधांगी भूमिका साकारल्या

खरंतर मी आजपर्यंत चित्रपट व मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. काकीची आव्हानात्मक भूमिका आता साकारली. त्यामुळे माझं पाहून मराठीतील इतर अभिनेत्रीही अशा प्रकारच्या धाडसी भूमिका साकारतील. काकी आधी अनेक भूमिका साकारल्या आणि त्या सगळ्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बडी बेगम सारखी छोटी भूमिका ही लक्षात राहिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com