Inflation
InflationE sakal

महागाईमुळे अनेक उत्पादनांचा आकार घटलाय आणि किंमत वाढलीय...

पाकिस्तानात तर एका मंत्र्याने दिवसभरात किमान कपभर चहा कमी प्या, जेणेकरून अर्थव्यवस्था सावरेल, असा सल्ला पाकिस्तानी जनतेला दिला होता.

कोरोनाचे संकट असे काही येवून आदळले की, त्याच्या संसर्गाच्या वावटळीत घरादारापासून ते देशादेशांना त्याची किंमत चुकवावी लागली. त्याने माणसं तर हिरावून नेलीच, शिवाय अर्थकारणाचा सगळा कणाच मोडून टाकला. त्यातून बाहेर पडणे अद्याप बाकी आहे, कोरोनाचे संकट अद्याप कायम असतानाच, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाने समस्या आणि प्रश्नांत भर घातली. इंधनाच्या किंमतीचा भडका उडाला. आफ्रिकेतील अनेक देशांसह सुमारे पन्नासवर देशांच्या अन्नपुरवठा साखळीत त्याने व्यत्यय आला. रशियावर निर्बंध लादले गेले. युरोपातील अनेक देशांना रशियाच इधन पुरवठा करते. युरोपीय देशांना रशियाला जेरीला तर आणायचे आहे, धडा शिकवायचा आहे, पण तेथील ऊर्जेची गरज भागवण्याकरता रशियाचे खनिज तेलही हवे आहे.

या कोंडीचा व्यापक परिणाम जागतिक अर्थकारणावर दिसू लागला आहे. सगळीकडे महागाईचा भडका उडालेला आहे. पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती कोरोनाने मुळात नाजूक बनली होती, ती या युद्धाने पुरती उद्धवस्त झाली. त्याच वाटेने पाकिस्तान जाईल, अशी स्थिती आहे. पाकिस्तानात तर एका मंत्र्याने दिवसभरात किमान कपभर चहा कमी प्या, जेणेकरून अर्थव्यवस्था सावरेल, असा सल्ला पाकिस्तानी जनतेला दिला होता. थोडक्यात जगभरातील अनेक अर्थव्यवस्था टोकाच्या प्रतिकुलतेतून वाटचाल करत आहेत. महागाईचा उडालेला भडका आता वणवा झालेला आहे. २०२३ या वर्षांत त्याचा परिणाम म्हणून साऱ्या जगभर मंदीची लाट येईल, असा अंदाज अनेक बँकर, अर्थवेत्ते, गुंतवणूक सल्लागार देवू लागले आहेत. महामारीतून सावरत असतानाच जर ही महामंदी आली तर तग धरून कसे राहायचे हा प्रश्न जगभरातील घरादारांपासून ते देशोदेशीच्या अर्थव्यवस्थांसमोर आ वासून उभा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com