अशी दुर्बीण ज्यामुळे कदाचित एलियनही दिसतील..! | Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशी दुर्बीण ज्यामुळे कदाचित एलियनही दिसतील..!}

अशी दुर्बीण ज्यामुळे कदाचित एलियनही दिसतील..!

एलियन अर्थात परग्रहवासीयांबद्दल आपल्या सर्वांनाच कुतूहल आहे. ते खरंच अस्तित्वात आहेत का, असले तरी राहतात कुठे, ते नक्की दिसतात तरी कसे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. इजिप्तच्या पीरॅमीडपासून ते माचू-पीचू पर्यंत पृथ्वीवरील आश्चर्य हे परग्रहवासीयांचीच निर्मिती असावी, इथपर्यंत आपला कायास. जेव्हापासून माणसाला स्वतःचे आणि सूर्यमालेचे भान आले. तेव्हापासून प्ररग्रहवासीयांच्या अस्तित्वाबद्दल मानवी मेंदू अगदी वेडावून गेला आहे. आपल्या आकलनापलीकडील प्रत्येक गोष्टीशी परग्रहवासीयांचा सबंध आहे का नाही, याची पडताळणी केली जाते. मात्र खऱ्या अर्थाने परग्रहवासीयांचा शोध खगोलशास्रज्ञ आणि पृथ्वीवर अस्तितात असलेल्या दुर्बिणी घेत आहे, असं काहीसं म्हणायला हरकत नाही. तारे, दीर्घिका, नेब्युला, कृष्णविवर एवढंच काय पृथ्वीसदृष्य ग्रहांचा शोध घेण्यासाठी महाकाय रेडिओ दुर्बिणींचा वापर करण्यात येत आहे. या सर्व अवकाशीय घटकांना अधिक स्पष्टतेने बघण्यासाठी, कदाचित काही ग्रहांनाच टिपण्यासाठी जगभरातील शास्रज्ञ एकत्र येऊन एक महाकाय दुर्बीण साकारत आहे. कदाचित या दुर्बिणीने भविष्यात परग्रहवासीयांचे कारनामे टिपली जातील. आतातर याबद्दल स्पष्ट सांगता येत नाही. मात्र ही दुर्बीण काय प्रकार आहे. आपण जाणून घेऊयात

खगोलशास्त्रातील अमर्याद शक्यतांची दारे खुली करणारी आणि जगातील आजवरची सर्वात अत्याधुनिक रेडिओ दुर्बीण ‘चौरस किलोमीटर अकाशगविन्यास वेधशाळा’ अर्थात स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्व्हेटरी (एसकेएओ) येत्या दशकात अस्तित्वात येत आहे. पुढील काही महिन्यातच भारत या समितीचा कायमस्वरूपी सदस्य होण्याच्या मार्गावर आहे. रेडिओ खगोलशास्त्राच्या दृष्टीने ‘चौरस किलोमीटर अकाशगविन्यास वेधशाळा’ अर्थात स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्व्हेटरी (एसकेएओ) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रथमच जगभरातील शास्त्रज्ञांनी एकत्र येत खगोलशास्त्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या दुर्बिणीचा आविष्कार करण्याचे निश्चित केले आहे. विश्वाच्या निर्मितीपासून ते परग्रहवासीयांच्या अस्तित्वासंबंधीचे संशोधन या दुर्बिणीच्या माध्यमातून होईल. भारताच्या दृष्टीने हा प्रकल्प एक रोमांचकारी अनुभव असणार आहे. कारण १९६० पासून देशाला रेडिओ खगोलशास्त्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. रेडिओ खगोलशास्त्रामध्ये आपण एक नेतृत्व करणारा देश आहोत. एसकेएओच्या माध्यमातून आपण एक प्रकारे पुढचा भविष्यकालीन टप्पा गाठत आहे. एसकेएच्या निमित्ताने नवीन
संशोधन आणि खगोलशास्त्राच्या नव्या युगाला प्रारंभ होणार आहे.

हेही वाचा: CET परीक्षा अर्जप्रक्रिया आजपासून सुरू, मे-जूनमध्ये पेपर होणार

पुण्यातीलGMRT पथदर्शक दुर्बिण ः


सध्या अस्तित्वात असलेली जगातील सर्वात अद्ययावत रेडिओ दुर्बीण अर्थात खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप(Giant Meterwave Radio Telescope (GMRT)) भारताकडे आहे. या माध्यमातून आपण रेडिओ खगोलशास्त्रात अगदी सुरवातीपासूनच भरीव योगदान देत आहोत. भारतीय शास्त्रज्ञांसह जगभरातील शास्त्रज्ञ या रेडिओ दुर्बिणीच नवीनतम संशोधनासाठी वापर करतात. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना रेडिओ दुर्बिणीच्या वापरासंबंधीचा अनुभव तर आहे. पण त्याचबरोबर त्यातून आवश्यक विज्ञान मिळविण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे. आधीपासूनच भारती शास्त्रज्ञ जगभरातील रेडिओ खगोलशास्त्र संशोधन गटाचे नेतृत्व करताना दिसतात. एसकेएओ दुर्बीण पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यासाठी आणि तीच्या माध्यमातून नवे संशोधन समोर आणण्यात भारतीय शास्त्रज्ञांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. (Square Kilometre Array (SKA))एसकेए सारखी विशाल आणि गुंतागुंतीची दुर्बीण उभारताना लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे निश्चितच आव्हानात्मक आहे. असे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये भारतीय उद्योगांकडे आहेत. कारण एसकेसाठी लागणारे ‘टेलिस्कोप मॅनेजमेंट सिस्टम’चे प्रारूप आपण उद्योगांच्या मदतीने सादर केले असून, त्याला एसकेएओची तत्त्वतः मान्यताही मिळाली आहे. दुर्बिणी उभारणीच्या कामात भारत इतर देशांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे याचा फायदाही भारतीय उद्योग क्षेत्राला होणार आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात उभारण्यात येणाऱ्या ‘एसकेएओ लो’ या दुर्बिणीच्या डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग हार्डवेअर रामन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि उद्योगांच्या सहकार्याने विकसित करणार आहोत. दुर्बिणीने संकलित केलेली प्रचंड माहिती साठविण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी आपल्याकडे विभागीय माहिती केंद्र असेल. दुर्बिणीपासून ते डेटा स्टोअरेज सेंटरपर्यंत जाणारा डेटा हा आज जगात वापरण्यात येणाऱ्या इंटरनेटच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटाचे विश्लेषण करण्यासाठी सुपर कॉम्प्युटर्स लागतील. पर्यायाने खगोलशास्त्राबरोबच इतर विज्ञानशाखा आणि तंत्रज्ञानाला या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा: MMRCL Recruitment 2022: मुंबई मेट्रोमध्ये अनेक पदांवर भरती, नोकरीची सुवर्ण संधी

एनसीआरएची भूमिका ः


भारताच्या दृष्टीने एसकेएओमध्ये एनसीआरए एक नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. देशाने निश्चित केलेल्या काही ‘मेगा प्रोजेक्ट्स’ पैकी हा एक प्रोजेक्ट आहे. केंद्र सरकारचा अणु ऊर्जा विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभाग ही दोन मंत्रालये यात सहभागी. देशातील रेडिओखगोलशास्त्राच्या विकासमध्ये एनसीआरएची महत्त्वपुर्ण भूमिका राहीली आहे. उटी आणि खोडद येथील रेडिओ दुर्बिणीचे संचालन एनसीआरए करते. त्यासाठी लागणारे स्वदेशी तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचे कार्यही एनसीआरए करते. देशात स्थापन झालेल्या ‘एसकेएओ’ इंडिया कन्सॉर्शनचे नेतृत्व आम्ही करतो.
एसकेएच्या उभारणीसाठी लागणारे तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या माहितीवरील संशोधनात एनसीआरए महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. भविष्यात एसकेए दुर्बिणीने संकलित केलेल्या प्रचंड मोठ्या माहितीचे विश्लेषण करण्याचे क्लिष्ट आव्हान आपल्यासमोर असेल. दुर्बिणीतून मिळणाऱ्या माहितीच्या संकलनासाठी भारतात विभागीय माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे भारतीय संशोधकांना अल्गॉरिदम विकसित करणे, तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन क्षितीजे लाभणार आहे.

काय ?

जगातील आजवरची सर्वात मोठी, आधुनिक आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातील शास्त्रज्ञ एक रेडिओ दुर्बीण विकसित करत आहे. चौरस किलोमीटर आकारामध्ये रेडिओ लहरींचे संकलन करणाऱ्या दुर्बिणीचे ॲरे अर्थात (आकाशगविन्यास) तयार करण्यात येतील. असे अनेक आकाशगविन्यास जोडून ही अति संवेदनशील दुर्बीण तयार होणार आहे.

कोठे?

पश्चिम ऑस्ट्रेलियातील मुर्शीसन वाळवंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या कारू भागात

केव्हा?

एसकेएओचा फेज - १ या दशकात अस्तित्वात येईल. तर फेज -२ चे काम २०३५ मध्ये सुरू होईल.

कसे?

दक्षिण आफ्रिकेत १३० गोलाकार (डिश ॲन्टेना) दुर्बिणी बसविण्यात येतील. तर ऑस्ट्रेलियात एक लाख तीस हजार डायपोल आकाराच्या दुर्बिणी बसविण्यात येतील. या दुर्बिणीच्या माध्यमातून आकाशातील तारे, पल्सार, दीर्घिका आदी अवकाशीय घटकांतून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ लहरींची एकत्रित नोंद करता येईल. अतिशय संवेदनशील आणि प्रभावी माध्यम असल्यामुळे अशा अवकाशीय घटकांचे निरीक्षण आणि अभ्यास या वेधशाळेच्या माध्यमातून होणार. ५० मेगाहर्ट्झ ते २५ गिगाहर्ट्झ पर्यंतची वारंवारिता यामुळे कक्षेत येणार आहे.

कोण?

१) कार्यकारिणीतील देश ः दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलॅंड, पोर्तुगाल आणि ब्रिटन
२) सध्याचे निरीक्षक देश ः भारत, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Science and Technology