प्रत्येक व्यक्ती एक कथा असते ती ऐकायला तुम्हाला आवडेल का? वाचा ह्युमन लायब्ररीबद्दल Human library | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Human library }

प्रत्येक व्यक्ती एक कथा असते ती ऐकायला तुम्हाला आवडेल का? वाचा ह्युमन लायब्ररीबद्दल

काही दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपवर एक पोस्ट वाचायला मिळाली. पोस्ट होती ह्यूमन लायब्ररी अर्थात मानवी वाचनालयाची . व्हॉटसअॅपवरील अन्य पोस्टप्रमाणे नजर टाकून दुसऱ्या ग्रुपवर गेलो. परंतु दुसऱ्या ग्रुपवर गेलो तरी मनातून ती पोस्ट काही केल्या जात नव्हती. पुन्हा त्या ग्रुपवर गेलो आणि पोस्ट वाचली...भलताच विलक्षण विलक्षण प्रयोग! (Human library)

डेन्मार्कमध्ये पुस्तकांच्याऐवजी माणसांचे वाचनालय आहे. तिथे ३० मिनिटांसाठी माणसे त्यांच्या आयुष्याची गोष्ट सांगायला मिळतात. या प्रयोगामागचे मूळ उद्दिष्ट आहे, आपले पूर्वग्रह दूर करणे. प्रत्येक व्यक्तीला एक शीर्षक असते, बेरोजगार, निर्वासित, बाय-पोलर, त्यांची कथा ऐकली की आपल्याला कळते, पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून त्याची गुणवत्ता ठरवू नये, हे ब्रीद घेऊन हा लायब्ररी अर्थात वाचनालय काम करते. माणूसपणाच्या या वाचनालयाची संकल्पना प्रत्यक्षात २२ वर्षांपूर्वी म्हणजे २००० अस्तित्वात आली. त्याला मूर्त स्वरूप यायला २००६ उजाडावे लागले. आता ही चळवळ म्हणजे वाचनालये वाचनालये ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहेत. खरंचच आश्चर्य वाटावे अशी ही चळवळ आहे. आता हे सांगायचे कारण म्हणजे कोरोनाच्या आपत्तीनंतर माणूस खूप एकटा पडल्याची भावना आहे. जो तो मोबाईल नावाच्या यंत्राशी इतका एकरूप झाला आहे की, त्याला जगाचे भानच राहिले नाही. अशा परिस्थितीत आपले म्हणणे कोणीतरी ऐकणारे आहे आणि दुसऱ्याला काहीतरी सांगावे असे वाटत आहे, ही भावना खूपच भावणारी आहे. भारतातील काही शहरांमधून मानवी वाचनालयाची सुरूवात झाली आहे.

खरंतर कोणत्याही आपत्तीनंतर समाजात अस्थिर व अनिश्चिततेचे वातावरण तयार होते. अशाश्वत वातावरण निर्माण झाल्यानंतर, अनेकांसाठी इतर अनेक प्रश्नांसह, मानसिक आरोग्यविषयक प्रश्नही निर्माण करीत असते. अगदी दैनंदिन दिनक्रम थोडा विस्कळित झाला तरी अनेक लोक अस्वस्थ होतात व त्यांच्यात मानसिक स्तरावरील अस्वस्थतेची लक्षणे दिसू लागतात.घरातील वीज ४ तास जाणे, सकाळी पाणी न येणे, मोबाईल/टीव्ही बंद पडणे अशा किरकोळ कारणानेही अस्वस्थ होणारी लोक आपण घराघरांत पहात असतो. मात्र एखादी नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती येते तेव्हा सगळाच समाज मानसिक स्तरावर एकदम अस्वस्थ होतो. कोरोना संसर्गामुळे आपल्या सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात भीती व तणाव काय असतो याची जाणीव झाली आहे. विलगीकरणात राहिल्यावर आपल्याला आपल्या माणसांची किंमत कळायला लागली. शारीरिक आरोग्यालाही जिथे फारच कमी महत्त्व दिलं जातं, तिथे मानसिक आरोग्याची कथा अधिकच गंभीर असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१९च्या अहवालानुसार भारतात २० कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता आहे आणि भारताचा नैराश्यग्रस्त व्यक्ती असलेल्या देशांत सहावा क्रमांक लागतो. म्हणजे खरंतर मानसिक आरोग्याला आपल्याकडे प्राधान्यक्रम असला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही.

हेही वाचा: ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाला चालना मिळाली

जागतिक आरोग्य संघटनेबद्दल काही घटकांना मनात शंका असतील तरी ही या माहितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणतीही आपत्ती किंवा साथीचे आजार येतात, तेव्हा अचानक अशी यंत्रणा उभी करणं शक्यच नसतं. ती वेळ निभावून नेली जाते आणि होणाऱ्या परिणामांबरोबर अनेकांना अनेक वर्ष जगावं लागतं. कोरोना संसर्गाने आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्या वाढविल्या आहेत. अशा परिस्थितीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याची खूपच आवश्यकता निर्माण झाली आहे. आणि त्यामुळेच मानवी वाचनालयाची गरज अधोरेखित होत आहे. घरातील प्रत्येकाकडे वेळ कमी झाला आहे. घरातील संवाद त्यामुळे हरवत चालला आहे. पूर्वी कुटुंबातच एकमेकांशी सशक्तपणे हितगूज व्हायचे त्यामुळे अशा प्रयोगांची आवश्यकता नसायची. आता मात्र कुटुंबातील संवादच हरवत चालला असला असल्याने मानवी वाचनालयाच्या प्रयोगाची आवश्यकता लक्षात येते.

महामारी किंवा साथीच्या आजाराची एक ‘मानसिक बाजू’ही असते. याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणूनच आपण सगळेच जण कमी अधिक प्रमाणात मानसिक स्तरावर अस्वस्थ आहोत. अर्थातच या अस्वस्थेची तीव्रता, वारंवारता व कालावधी प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. आपत्ती कोणती आहे, किती काळ टिकणारी आहे व काय प्रकारचे नुकसान करणारी आहे यावरही लोकांमधील मानसिक अस्वस्थतेची तीव्रता व मानसिक प्रश्नांचा आवाका व खोली अवलंबून असते. कोरोना संसर्गामुळे आपले मानसिक, सामाजिक, आर्थिक व भावनिक विश्व ढवळून निघाले आहे. याचा थेट परिणाम आपल्या नातेसंबंधांवरही काही प्रमाणात दिसू लागला आहे. याचे दूरगामी परिणाम आपल्याला नक्कीच व्यक्तिगत, सामाजिक, कौटुंबिक व मानसिक स्तरावर भोगावे लागणार आहेत. आपत्तीपश्चात या अनुषंगाने अनेक आव्हाने आपल्यासमोर उभी राहिली आहेत. आजपर्यंत आपण पाहिलेल्या अनेक आपत्तीपेक्षा कोरोनाचे स्वरूप वेगळे आहे.

हेही वाचा: ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाला चालना मिळाली

या आपदेमुळे लोकांमध्ये भीती, काळजी, चिंता, चिडचिड होणे, नैराश्य, औदासिन्य, झोप न येणे, भूक मंदावणे, न लागणे, छातीत धडधड होणे इ. लक्षणे दिसत आहेत. पूर, चक्रीवादळ, सुनामी, वणवा, गारपीट, ढगफुटी, भूकंप, भुउत्खलन, दुष्काळ अशा नैसर्गिक अथवा रेल्वे, विमान, मोटार अपघात, आग, गॅसगळती, पूल कोसळणे इ मानवनिर्मित आपत्तीत मनुष्यहानी, वित्तहानी किंवा अनेकदा लोक आपले सर्वस्व गमवून बसतात. एका क्षणात इतके नुकसान सहन करणे, इतका मोठा धक्का पचविणे सर्वसामान्यपणे कोणालाही शक्य नसते. अशा घटनेमुळे मेंदूवर येणारा प्रचंड ताण, सहन करणे कोणालाही सहज शक्य नसते व यातूनच निर्माण होतात अनेक मानसिक आरोग्य विषयक प्रश्न व समस्या.

एक दिवस दिनक्रम बदला तरी आपण अस्वस्थ होतो मग अशा मोठ्या आपत्तीत आयुष्याचा जीवनक्रमच विस्कळित झाल्यानंतर अनेक लोकांना यातून बाहेर पडायला मोठा कालावधी लागू शकतो. मानसिक आरोग्य विषयक मदत वेळेत न मिळाल्यास अनेक लोकांना तीव्र मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकत. कोणतीही आपत्ती, आपल्या सामाजिक व मानसिक आरोग्यास अनेक प्रकारांनी धक्के देत असते व या आपदेत या दोन्ही स्तरावर आपण अनेक आव्हानांना सामोरे जात आहोत. या संसर्गाच्या सहा महिन्यात सामाजिक स्तरावरही अनेक आव्हाने उभी राहिलेली आहेत. वाढती बेरोजगारी, दारिद्र्य, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसा, गुन्हेगारी या सगळ्यामुळे सामाजिक स्वस्थ बाधित होत आहे. कोरोना आपदेमुळे समाजातील अनेक व्यवस्था निष्क्रीय झाल्या तर काही व्यवस्था या काळाची गरज म्हणून उभ्या केल्या गेल्या. समाज जीवनातील व्यवहारात काही ठिकाणी कोरडेपण आले तर दैनंदिन व्यवहारातील मूल्ये सोईनुसार बाजूला सारून लोक पुढे गेले. या आपदेने उभ्या केलेल्या आव्हानांमुळे समाजाचे रंग, रूप व स्वभाव बदलत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Denmarkpsychologist
go to top