जाणून घ्या जगातल्या आनंदी देशांबद्दल
जाणून घ्या जगातल्या आनंदी देशांबद्दल- Esakal

काय आहे आनंदी देशांचे रहस्य?

संयुक्त राष्ट्रांकडून आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स) दरवर्षी तयार केला जातो. हा अहवाल तयार करण्याचे हे यंदाचे दहावे वर्ष आहे. त्या आधारावर जगातल्या आनंदी देशांची यादी तयार केली जाते...जाणून घ्या अशा आनंदी देशांबद्दल

नंद कुणाला नको असतो जगातील प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असते मग ती कुठल्याही देशातील असो समाजाच्या कुठल्याही वर्गातील असो गरीब किंवा श्रीमंत असो. प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो. पण सुखी माणसाचा सदरा शोधणा-या उघड त्याचप्रमाणे आनंदी माणसाचा शोध घेणे अवघड. आनंदी जीवनाचे रहस्य काय, असा प्रश्न पडतो. अर्थात, त्याचे उत्तर मिळाले तरी सर्वजण आनंदी होतीलच, असे नाही. (Know about most happiest countries in the world)

संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) गेल्याच महिन्यात जगातील आनंदी (Happy) देशांची क्रमवारी जाहीर केली. या १४६ देशांच्या यादीत फिनलॅंड या देशाने सलग पाचव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. जगातील सर्वांत आनंदी देशाचा मान फिनलॅंड या देशाला मिळाला आहे. यंदाच्या यादीत डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. आईसलॅंड, स्वीत्झलंड, नेदरलॅंड हे देशही आनंदी असून यादीत ते अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com