प्रीमियम ग्लोबल
पद्मश्री नंदा प्रुस्टी - १०२ वर्षे वयापर्यंत मास्तर!
नंदा प्रुस्टी यांना त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल वयाच्या १०२ व्या वर्षी पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले. ओरिसामधील जाजपूर जिल्ह्यातील कंतिरा गावात मुले व ज्येष्ठांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी जवळजवळ सात दशके काम केले आहे. नंदा मास्तर म्हणून ते परिचित होते. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांचे कोरानामुळे निधन झाले. अक्षरओळख व खास करून गणित शिकविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सकाळी नऊपर्यंत व दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत मुले त्यांच्याकडे शिकायला यायची. ज्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नाही असे ज्येष्ठही सायंकाळी त्यांच्याकडे शिकायला यायचे व स्वतःचे नाव व सही करायला शिकायचे.