कोष्टी साप खातात...! | Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spider Eating Snake}

कोष्टी साप खातात...!

कोष्टी साधारणपणे किटक, कृमी किंवा लहान पाली, बेडूक खातो. पण, काही अर्कनिड्स कुळातील कोष्टी खूपच खादाड असतात. त्यांच्या आकारापेक्षा ३० पट अधिक मोठा असणारा सापही ते खाऊ शकतात, असे मत एका संशोधनात मांडण्यात आले आहे. या संशोधनावर आधारित हा लेख...

ऑस्ट्रेलियन रेडबॅकला पाय नसतात. या कोष्टीच्या प्रजातीची मादी छोट्या आकाराची असते. पण, तिच्यापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष ती खाऊ शकते. उदाहरणार्थ- जगातील सर्वांत विषारी तपकिरी साप. रेडबॅकच्या जाळ्यात हा तपकिरी साप अडकला तर तो त्याला भक्ष करतो, असे मत मार्टिन निफेलर आणि जे. व्हिटफिल्ड गिबन्स या संशोधकांनी जर्नल ऑफ अरॅक्नोलॉजीमध्ये प्रकाशित शोधनिबंधात व्यक्त केले आहे. येथे दोघेही जॉर्जिया आणि बासेल येथील अमेरिकन विद्यापीठात संशोधनाचे काम करतात.

Spider Eating Snake

Spider Eating Snake

हेही वाचा: गॅस : एलपीजी की पीएनजी?

सापाला कोष्टी कसे मारतो?

कोष्टीच्या जाळ्यात साप अडकल्यावर तो अडकलेला साप बाहेर पडण्यासाठी झटापट करतो. तेव्हा सर्वप्रथम तो कोष्टी लांब, चिकट रेशीम धाग्याचा गुंता तयार करतो. त्यात हा साप अधिकच गुंतत जातो. गुंतलेल्या सापास संधी साधत हा कोष्टी विषाचा दंश करून त्याला मारतो, असे मत मार्टिन निफेलर आणि जे. व्हिटफिल्ड यांनी शोधनिबंधात व्यक्त केले आहे.

या संदर्भात संशोधकांनी कोष्टीने साप मारून खाण्याच्या ३१९ घटनांची नोंद घेतली. त्यानंतरच त्यांनी हा दावा केला आहे. अंटार्क्टिका सोडून जवळपास सर्वच खंडांमध्ये या घटनांची नोंद या संशोधकांनी केली. कोष्टीने सापाला भक्ष केल्याच्या जवळपास ५१ टक्के घटना या अमेरिकेत, तर २९ टक्के घटना ऑस्ट्रोलियात नोंदविल्या आहेत. पकडण्यात आलेले साप आकाराने लहान असतात. सरासरी २५ ते २७ सेंटिमीटर लांबीचे असतात. अकरा कुळातील ४० प्रजातींचे कोष्टी हे सापांना भक्ष बनवतात, असे मत संशोधकांनी नोंदविले आहे. यात ऑस्ट्रोलियन रेडबॅक स्पायडर (Latrodectus hasselti), आफ्रिकन बटन स्पायडर (Latrodectus indistinctus), इस्राईल बिडो स्पायडर (Latrodectus revivensis), तर नॉर्थ अमेरिकन विडो स्पायडर (Latrodectus geometricus, Latrodectus hesperus, Latrodectus mactans and Latrodectus variolus) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Spider Eating Snake

Spider Eating Snake

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य

संशोधकांनी व्यक्त केली ही शंका...

कोष्टीने सापास मारण्याची घटना नेहमीच घडत असेल, असे मला वाटत नाही. माझा यावर विश्वास बसणे कठीण आहे. कारण सापाच्या सात कुळांना कोष्टी भक्ष करतात, असे मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे. यात कोरल स्नेक, रॅटलर्स, पाम-पिटीव्हीपर्स आणि लान्सहेड्स यांचा समावेश आहे. हे तर अतिविषारी साप आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील काही साप कणखर आणि मोठेही आहेत.
- मर्सिडीज बर्न्स, उत्क्रांतीवरील जीवशास्त्रज्ञ, मेरिलँड विद्यापीठ, बाल्टिमोर

Spider Eating Snake

Spider Eating Snake

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top