Masaka Kids orphan
Masaka Kids orphan

युगांडातील अनाथ ‘मसाका किड्स’ची आदर्श यशोगाथा

नृत्य, गायनातून आयुष्यात सुखाचे सूर

अन्न, निवारा व वस्त्र या तीन मूलभूत गरजांबरोबरच शाळेत शिकायला मिळणे हे दारिद्र्यात जगणार्‍या मुलांचे स्वप्न साकार तर झालेच शिवाय जगभरात त्यांना अमाप प्रसिद्धीही मिळाली. मात्र गरिबीमुळे मिळालेली ही सहानुभूती नसून या मुलांनी त्यांच्या अंगभूत कौशल्यामुळे ही मुले जगप्रसिद्ध झाली आहे. ही मुले गाण्यात व नृत्यात निपुण आहे. पूर्व आफ्रिकेतील यूगांडा या तुलनेने गरीब देश. एड्सची साथ, वर्षानुवर्षे सुरू असलेली अंतर्गत यादवी, युद्ध आणि पराकोटीचे दारिद्र्य अशा अनेक संकटांमुळे येथे अनाथ मुलांची संख्या जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. २०१२च्या आकडेवारीनुसार युगांडात अनाथ मुलांची संख्या १६ लाख (स्रोत ः ncbi.nlm.nih.gov) एवढी नोंदवली आहे.

अशा मुलांचे भविष्य सुखी, आनंदी व आरामदायी बनविण्याचा ध्यास घेऊन सुना हसन याने मार्च २०१३मध्ये मसाकामधील ११ हरहुन्नरी मुलांचा ‘द मसाका किड्स आफ्रिकाना’ हा ग्रुप स्थापन केला. तोच या ग्रुपचा सरचिटणीसही तोच आहे. हसन हा स्वत: युगांडातील असल्याने तेथे जगण्यासाठी करावी लागणारी धडपड त्याने जवळून पाहिली आहे. म्हणूनच नियेन्डोमधील कायरिकीती गावातील तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या गायन व नृत्यकलेला त्याने या ग्रुपच्या माध्यमातून मुलांच्या प्रोत्साहन दिले. हसनच्या प्रयत्नांना मनापासून साथ दिलेल्या या मुलांचे भविष्य मार्गी लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com