आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा! | Health Benefits of Eating Almonds | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Benefits of Eating Almonds }

नाताळ सणाच्यावेळी अनेकजण कुटुंबीय व मित्रांसोबत स्वादिष्ट भोजनासह विविध प्रकारच्या मिठाईंचा आस्वाद घेतात. पण, तोंडाला पाणी आणणाऱ्या विविध फिस्ट्स व पार्ट्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी उत्तम नाहीत. त्यासाठी कुटुंबीयांच्या रोजच्या आहारामध्ये कुरकुरीत व पौष्टिक बदामांची भर करत नाताळ सणासह नववर्षाचा आनंद घ्या. (Health Benefits of Eating Almonds)

आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा!

हिवाळ्यामध्ये हवेत गारवा असतो अन् रात्रही मोठी असते. हवेमध्ये गारवा असला तरी त्यामध्ये प्रेम व आनंद सामावलेला असतो. या काळादरम्यान नाताळ सण अन् नववर्षाचे स्वागतही केले जाते. जगाच्या विभिन्न भागांमध्ये नाताळ सण वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जात असला तरी त्यामधील उत्साह सर्वत्र एकसमान असतो. हा सण सर्वांना एकत्र आणतो, आपण एकमेकांचे कौतुक करण्यासोबत एकमेकांना आनंद देतो. चमकणारे दिवे आणि ख्रिसमस झाडांसह घरे सजलेली असतात आणि प्रियजनांना भेटवस्तू व ट्रीट्स दिल्या जातात.

अनेकजण कुटुंबीय व मित्रांसोबत स्वादिष्ट भोजनासह विविध प्रकारच्या मिठाईंचा आस्वाद घेतात. पण, ते आरोग्यासाठी उत्तम नाहीत. पौष्टिक खाद्यपदार्थांची भर करत आरोग्यदायी नाताळ साजरा करणे शक्य आहे. बदाम हे आरोग्यदायी खाद्यपदार्थाचे परिपूर्ण उदाहरण आहे. ते भूक भागवून आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. तसेच बदाम उत्तम आरोग्य देण्यासाठी ओळखले जातात. बदामांमधून हृदयाचे आरोग्य, मधुमेह व वजन नियंत्रण असे अनेक लाभ मिळतात. बदाम हे वैविध्यपूर्ण गिफ्ट आहे. ते कच्चे, भाजलेले किंवा फ्लेवर्ड अशा कोणत्याही प्रकारामध्ये दिवसातून कधीही किंवा भोजनांदरम्यानच्या काळात सेवन करता येऊ शकतात. तर मग यंदा नाताळला पाहुण्यांना बदामांची ट्रीट देण्यासोबत कुटुंबीय व मित्रांना भेटवस्तू म्हणून बदाम द्या.

हेही वाचा: या ‘काडी’ मुळे भडकणार आणखी महागाई

अनारोग्यकारक खाद्यपदार्थांऐवजी आरोग्यदायी खाद्यपदार्थांसह जीवनशैली संतुलित करण्याबाबत सांगताना आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान म्हणाली, ‘‘माझ्यासाठी नाताळ म्हणजे कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करणे आणि भेटवस्तू देणे. यंदा मी विचारपूर्वक भेटवस्तू देणार आहे, जे माझे मित्र व कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतील. त्यामध्ये बदाम अग्रस्थानी आहेत. असे करण्याचे फायदे दुहेरी आहेत. पहिले म्हणजे बदाम स्वादिष्ट स्नॅक म्हणून सर्व्ह करता येतात आणि दुसरे म्हणजे बदामांमध्ये आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक असलेले विविध पौष्टिक घटक आहेत, ज्यामुळे बदाम अगदी योग्य भेटवस्तू आहे.’’

फिटनेस व सेलिब्रिटी इन्स्ट्रक्टर यास्मीन कराचीवाला म्हणाल्या, ‘‘नाताळ म्हणजे आठवडाभर केकचा मनसोक्त आस्वाद घेणे आणि जल्लोष करणे. पण यामुळे अनेकदा पोट फुगणे व वजन वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. सण साजरा करण्याचा दृष्टिकोन बदलत हे चक्र मोडून काढा आणि त्याऐवजी बदामांसारखे आरोग्यदायी खाद्यपदार्थ भेटवस्तू म्हणून द्या. बदाम पार्टीदरम्यान तयार केल्या जाणाऱ्या पाककलांमध्ये वापरता येऊ शकतात किंवा कधीही स्नॅक म्हणून सेवन करता येऊ शकतात. बदाम ऊर्जा देण्यासाठी ओळखले जातात. याबाबत जागतिक व भारतीय संशोधनांमधून देखील निदर्शनास आले आहे की, बदामांच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यामध्ये आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत होते. तसेच, बदाम टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरू शकतात. म्हणूनच बदाम प्रियजनांना देता येईल, अशी सर्वोत्तम भेटवस्तू आहे.’’

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य

रितिका समाद्दार म्हणाल्या, ‘‘नाताळ हा सरत्या वर्षामधील आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि नवीन वर्षासाठी संकल्प करण्यासाठी उत्तम काळ आहे. यंदा आपल्या सर्वांना मिळालेली मोठी शिकवण म्हणजे आपल्या स्वत:सोबत आपल्या कुटुंबीयांच्या रोगप्रतिकारशक्तीची काळजी घेण्याची गरज. हीच शिकवण तुमच्या भेटवस्तू देण्याच्या योजनेमध्येही आत्मसात करा. प्रियजनांना कॅलरीयुक्त मिठाई किंवा चॉकलेट्स देण्याऐवजी बदामांचा अवलंब करा. बदामांमध्ये झिंक, फोलेट, जीवनसत्त्व ई व कॉपर यांसारखे रोगप्रतिकारशक्तीला साह्य करणारे पौष्टिक घटक असतात.’’

न्यूट्रिशन व वेलनेस कन्सल्टण्ट शीला कृष्णास्वामी म्हणाल्या, ‘‘नाताळ व वर्षाअखेरच्या वेळी आपल्यापैकी अनेकजण प्रियजनांनी भेटवस्तू म्हणून दिलेल्या गोड मिष्टान्नांचा मनसोक्त आस्वाद घेतात. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भेटवस्तू देण्याप्रती स्वत:चा दृष्टिकोन बदला. यंदा गोड मिष्टान्नांऐवजी बदामांसारखे आरोग्यदायी खाद्यपदार्थ भेटवस्तू म्हणून द्या. ते पौष्टिक व लाभदायी आहेत. खरंतर संशोधनातून निदर्शनास येते की, दररोज ४२ ग्रॅम्स बदाम खाल्ल्यामुळे सेंट्रल अडिपोसिटी अर्थात पोटाचा घेर कमी होतो व पर्यायाने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.’’

इंटेग्रेटिव्ह न्यूट्रिशनिस्ट व हेल्थ कोच नेहा रंगलानी म्हणाल्या, ‘‘नाताळ सण येताच प्रत्येकजण प्रियजनांना देण्यासाठी भेटवस्तूंचा शोध घेण्यास सुरवात करतात. विशेषत: हा सण साजरा करायला आवडणारे तरुण यामध्ये अग्रस्थानी असतात. पण, चॉकलेट्स किंवा केक्स देणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच अनारोग्यकारक खाद्यपदार्थ देण्याऐवजी बदामांचा अवलंब करा. बदाम आरोग्यदायी स्नॅक आहेत आणि भूक लागल्यास कधीही खाता येऊ शकतात. तसेच बदामांच्या सेवनामुळे प्री-डायबेटिस असलेले किशोरवयीन व तरुण व्यक्तींमधील ग्लुकोज चयापचय सुधारण्यामध्ये मदत होऊ शकते. बदामांचे सेवन रक्तशर्करा पातळ्या सुधारण्यासाठी लाभदायी ठरू शकते. ज्यामुळे तरुणांमध्ये मधुमेह आजार होण्याला प्रतिबंध होण्यास किंवा विलंब होण्यास मदत होते.’’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :health newsNuts
go to top