
सुनील चावके, नवी दिल्ली
राजधानी दिल्ली आणि राजकारण हे नाते अतूट आहे. ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीमध्ये होणार हे ठरल्यानंतर या उत्सवापासून राजकीय वर्ग अलिप्त राहू शकणार नाही हे उघडच होते. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांची वर्दळ असावी की नसावी, हा विरोधभक्तीचा वाद कधीही संपणारा नाही. तरीही दिल्लीचे संमेलन त्याबाबतीत अपवाद ठरावे. राजकीय वर्गाची साथ मिळाली नसती तर देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची दृश्यमानता वाढून ते यशस्वी होऊ शकले नसते, हेही तेवढेच खरे.