मास्कपासून मुक्ती कधी?| When We Will Be Free From Mask and Corona Virus | Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

When We Will Be Free From Mask and Corona Virus}

Corona Virus : मास्कपासून मुक्ती कधी?

पुणे शहरच (Pune) नाही तर संपूर्ण जगच गेल्या दीड-दोन वर्षांपासून नाक(Nose) आणि तोंड (Mouth) पूर्णतः झाकेल असे मास्क लावून फिरत आहे. सार्वजनिक व्यवहार करताना, रस्त्यांवर फिरताना, कार्यालयात काम करताना आपल्या सगळ्यांना मास्क(Mask) घालणे बंधनकारक आहे. कोरोना (Corona) झाला. त्यात अल्फा(Alpha), डेल्टा(Delta), ओमिक्राँन (omicron) या आणि अशा वेगवेगळ्या विषाणूंच्या व्हेरियंटने (Veriant) जगभर आतापर्यंत थैमान घातला. त्यामुळे मास्क मुक्ती (Mask Free) कधी, हा प्रश्न आता प्रत्येकाला सतावत आहे.((When Will Be Free From Mask and Corona Virus)

देशातील नाही, तर जगभरातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आता म्हणत आहे की, कोरोना हा आता एन्डेमिक होतोय. याचे व्हेरियंट भविष्यात येतील. पण, त्याची संसर्ग करण्याची क्षमता कमी राहील. सध्या धुमाकुळ घालत असलेल्या ओमिक्राँन व्हेरियंटचे असंख्य रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. हा गोष्टीकडे भविष्यात आपल्याला अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यानंतर कोरोना हा देखिल स्वाइन फ्ल्यूसारखा होईल. यासाठी किती दिवस, महिने की वर्ष लागेल हा आता कळीचा मुद्दा आहे.

कारण, कोरोनामुक्तीचा हा सामना आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावा लागणार आहे. कोरोना कमी झाला म्हणून थोडे जरी आपण गाफील राहीलो, तर सामना हातातून गेलाच म्हणून समजा. म्हणजे, गर्दी झाली की कारोना वाढला, असे समिकरण तयार होताना दिसते. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत कोरोनाविरोधातील हा सामना खेळावा लागणार आहे, याची मानसीक तयारी आता आपण सगळ्यांनी करायला हवी. गेल्या वर्षी दसरा-दिवाळीमध्ये कोरोना कमी झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीपासून कोरोनाची पुन्हा दुसरी लाट उसळली. ती आता कमी होत आहे. हे चित्र दिलासादायक असले म्हणून पुनहा बेजबाबदारपणे वागून चालणार नाही आणि परवडणार तर त्याहून नाही.

हेही वाचा: केस कापल्यावर रक्त का येत नाही? घामाला दुर्गंध कसा येतो?

गेल्या वर्षी २५ आक्टोबर रोजी राज्यात कोरोना १९ चे ८८९ रुग्ण आढळून आले होते. ६ मे २०२० म्हणजे तब्बल ५३८ दिवसांनंतर एका दिवसात राज्यात आढळलेले हे सर्वात कमी कोविड रुग्ण होते. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत दिसत होती. २५ आक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य खात्यात झालेली. २१ एप्रिल २०२० नंतर दैनंदिन मृत्यूची ही सर्वात कमी संख्या असल्याचे यातून अधोरेखित झालेले आणि हे केवळ महाराष्ट्रात घडत होते असे असे नाही. देशभरात आणि एकूण आशिया खंडात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने घटताना दिसत होता. या पार्श्वभूमीवर वाऱ्यावर वाहणारे हे कदंबाचे फूल नक्की कोणत्या दिशेने वाहणार आहे, हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात होता. कोविड पॅंडेमिक कडून एंडेमिक होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे का ? तिसरी लाट येणार की नाही ? आणि आपली मास्क पासून सुटका कधी होणार ? असे प्रश्न आपल्या मनात पुन्हा पुन्हा येत आहेत. या सर्व प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे कोणाजवळही नाहीत. पण आपल्या देशात आणि जगभरात घडणाऱ्या घडामोडी, वेगवेगळया देशातील कोविड परिस्थिती समजावून घेऊन तज्ञांनी काढलेले निष्कर्ष यावरुन आपण या प्रश्नाची अधिकाधिक अचूक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करु शकतो.

एखादा संसर्गजन्य आजाराचा उद्रेक होतो. समाजातील बहुतांश जणांचा याचा संसर्ग होतो. या रोगाने रुग्णांचा मृत्यू होतो. त्यानंतर त्या रोगजंतू स्वतःमध्ये बदल करायला सुरवात करतात. पण, पहिल्यापेक्षा बदललेला रोगजंतूंची दाहकता कमी होते. असचे सर्वसाधारण चित्र जगभरातील साथरोगाच्या उद्रेकात दिसते. कोरोना हा देखिल त्याच मार्गाने पुढे वाटचाल करत असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात पॅन्डेमिक आणि एंन्डेमिक अशा संकल्पना मांडल्या आहेत. जेव्हा एखाद्या रोगाची साथ जगभर पसरते त्याला पॅन्डेमिक म्हटले जाते. तर, तो रोगजंतू आपल्या वातावरणाचा नियमित भाग होतो त्याला एंन्डेमिक म्हटले जाते. स्वाइन फ्ल्यू ज्या प्रमाणे वेगाने वाढला आणि नंतर तो आपल्या वातावरणाचा भाग झाला. त्या प्रमाणे कोरोनाचे मार्गक्रमण होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.

हेही वाचा: सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान!

वातावरणातील बदल आणि साथरोग यांचाही जवळचा संबंध आहे. आपल्याकडे थंडी वाढली की, सर्दी-खोकल्याची साथ वाढते. पावसाळा सुरू झाली की तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, काही आजार हे हिवाळा-पावसाळा आला की वाढतात. त्यांचा स्थानिक पातळीवर उद्रेक होतो. हा संबंधीत आजार एन्डेमिक होण्याची प्रक्रियेचा भाग आहे.

भारतात कोरोना हा आता एन्डेमिक होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असल्याचे काही शास्त्रज्ञ म्हणतात. याचा अर्थ हा विषाणू आपल्या वातावरणातून जाणार नाही. त्याचा संसर्ग झालेले रुग्ण अधून-मधून आपल्याकडे निदान होतील.

ओमिक्राँन या नवीन व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने आता कोरोनाची तिसरी लाट येणार, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्याही काही अंशी वाढली असल्याने त्याला एका अर्थी पुष्टी मिळत आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने काही निर्बंधही घातले आहेत. या सर्वांचा विचार करता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं काय, या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे.

देशाची लोकसंख्या आणि कोरोनाच्या ओमिक्राँन व्हेरियंटच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पहाता तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत काही शास्त्रज्ञ व्यक्त करतात. पण, हे म्हणत असताना, युरोपात विशेषतः इंग्लंडमध्ये काय चाललंय याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांचे प्रमाण गेल्या काही आठवड्याच्या तुलनेत अंशतः वाढलेले आहे. इंग्लंडमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण बहुतांश पूर्ण झाले आहे. तेथील बहुतांश सर्व नागरिकांमध्ये कोरोना विषाणूंना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झाली आहे. त्याला वैद्यकीय परिभाषेत अँटिबॉडिज निर्माण होणे असे म्हणतात. अशा देशामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे म्हणत असताना, तेथे रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण एकदा बघणे आवश्यक ठरते. त्यातून असे दिसते की कोरोनाच्या यापूर्वीच्या लाटेच्या तुलनेत सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. इतकेच नाही, तर मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीचा फायदा होत असल्याचे अनुमान तज्ज्ञ काढतात.

हेही वाचा: आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा!

भारतातही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. आता लहान मुलांमध्येही लसीकरण सुरू होत आहे. फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात देशात कोरोनाची तिसरी लाट आली तरीही त्याची तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट डेल्टा व्हेरियंटमुळे आलेली होती. त्या वेळी हा नवीन व्हेरियंट होता. त्याला प्रतिकार करण्याची क्षमता आता आपल्यामध्ये निर्माण झाली आहे, असा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे. जगभरात गेल्या काही महिन्यांपासून डेल्टा हा व्हेरियंट धुमाकुळ घालत होता. त्यात बदल होऊन आता ओमिक्राँन हा नवीन व्हेरियंट तयार झाला आहे. विषाणूंनी त्यांच्या रचनेत बदल केल्याची जनुकिय विश्लेषणातून स्पष्ट झाले. या विषाणूमुळे आजाराच्या तीव्रतेमध्ये फारशी कोणतीही वाढ झालेली नाही, हेही स्पष्ट झाले आहे. पण, त्याचा संसर्गाचा वेग वाढल्याचे दिसते. देशात हा नवीन व्हेरियंटचे रुग्ण दिसू लागले आहेत. त्यामुळे मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टसिंग ही इतकीच आयुधे आपल्याला कोरोना प्रतिबंधासाठी आतापर्यंत होती. त्यात आता लशीची भर पडली आहे. ही लस कोरोनाला प्रतिंबध करते. त्यातूनही रुग्णाला कोरोना झालाच तर त्याची तीव्रता कमी होते. रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागत नाही. त्याला सौम्य लक्षणे असतात. घरात विलगिकरणामध्ये उपचार घेऊन रुग्ण काही दिवसांमध्ये पूर्ण बरा होतो. त्यामुळे आपल्याला मास्कचा कितीही कंटाळा आला असला तरीही कोरोना एन्डेमिक होण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला मास्कला सुटी देता येणार नाही. कारण, आपल्याला कोरोना विरोधातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायचाय आणि तो जिंकायचाय!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Coronaviruscovid 19Mask
go to top