
Jharkhand Election 2024 Analysis BJP Vs Congress
सुनील चावके
वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाल्यापासून पहिल्या १४ वर्षांत भरपूर राजकीय अस्थैर्य अनुभवणाऱ्या झारखंडला मागच्या दहा वर्षांत लागोपाठच्या दोन सरकारांची पूर्ण पाच वर्षे चालणारी सत्ताही लाभली. पण स्थैर्य लाभूनही आर्थिक विकासाचे गाडे फार पुढे सरकले नाही. झारखंडचा आर्थिक विकास जिथल्या तिथेच राहिला.