आता प्रचाराची धुरा मायावी विश्वावरच!

आता प्रचाराची धुरा मायावी विश्वावरच!

देशातील उत्तर प्रदेशसह(Uttar Pradesh) उत्तराखंड (Uttarkhand), पंजाब(Punjab), मणिपूर(Manipur) आणि गोवा (Goa) या पाच राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केल्या असल्यातरी त्याचा धुराळा काही अद्याप म्हणावा असा उडालेला नाही. कोरोनाने (Corona) गेली दोन वर्षे ठाण मांडल्याने जनजीवनावर जसा विपरित परिणाम झालेला आहे, तसा एकूण व्यवस्थात्मक आणि प्रशासकीय बाबींवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्याच्या कार्यवाहीला अडचणी येत आहेत. गेल्या वर्षी पश्चिम बंगाल (West Bengal), तमिळनाडू ( Tamil Nadu ), केरळ (Kerala) या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका (Assembly elections) पहिली लाट ओसरत असताना पार पडल्या आणि या निवडणुकांच्या निकालानंतर दुसरी लाट साऱ्या देशभर पसरली. त्याने साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. निवडणुका झालेल्या राज्यात कितीतरीपटीने कोरोनाचा प्रसार झाला. न्यायालयाला या सगळ्यांची दखल घ्यावी लागली. मद्रास उच्च न्यायालयाने(Madras High Court) निवडणूक आयोगावर खुनाचा आरोप का ठेवू नये, अशा शब्दांत ताशेरे ओढत आपली नाराजी प्रकट केली. अखेर निवडणूक आयोगाने निकाल आणि त्यानंतरच्या विजय मिरवणुका याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. तरीही त्याला हरताळ फासला गेलाच आणि निवडणुकीनंतर अनेक उमेदवार आणि विविध पक्षांचे नेते कोरोनाने बाधित झाल्याने रुग्णालयात दाखल झाले. (Now the focus of propaganda Assembly Election Of 5 state is on the Social Media)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com