देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनाच इतके महत्व का?

देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनाच इतके महत्व का?

भाजपसाठी यंदादेखील उत्तर प्रदेश निवडणूक कमालीची महत्त्वाची आहे. २०२४ मध्ये दोन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच भाजप या निवडणुकांकडे पहात आहे. आता उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळाले तर या वर्षी होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्याचप्रमाणे २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी जाणार आहे. त्यामुळेच या निवडणुकांसाठी भाजपने सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीची सारी सूत्रे गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती त्यासाठीच दिली आहेत.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरु आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रचारसभांना जरी परवानगी नसली तरी या निवडणणुकांमधे राजकीय हवा मात्र चांगलीच तापली आहे. त्या त्या राज्यात या निवडणुकांना महत्त्व आहेच त्यात शंका नाही. मात्र त्यातही उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः या राज्यातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशवर खिळल्या आहेत. याचे कारण म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये उत्तर प्रदेशला असलेले अनन्यसाधारण महत्त्व हे आहे. हे महत्त्व कशामुळे आहे याचा घेतलेला परामर्श

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com