Premium|Superbugs: तुम्हीही बरं वाटलं की औषधं घेणं बंद करता का.? पण हे जीवघेणं ठरू शकतं; लॅन्सेटचं संशोधन आणि WHO चा ‘ग्लोबल अक्शन प्लॅन’ सुपरबग्जविषयी काय सांगतोय..?

Antibiotics effect : २०५० पर्यंत अँटीबायोटिक्स निष्प्रभ होऊन साध्या जखमांमुळेही मृत्यू? आरोग्यखर्च आणि जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका?
antimicrobial resistance

antimicrobial resistance

Esakal

Updated on

पुणे – समजा, घरात काम करताना तुमच्या हाताला सुरी लागून चीर पडली. साधारण असं काही झालं की आपण त्यावर डेटॉल लावतो, एखादं मलम लावतो किंवा फार फार तर जवळच्या डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेतो.

पण समजा की २०५० हे वर्ष सुरू आहे आणि ही घटना घडली आहे. त्यावेळी चित्र काहीतरी वेगळं असू शकतं.

डॉक्टर जगातली सर्वात महागडी आणि शक्तीशाली अँटीबायोटिक गोळी देतात. पण, त्या गोळीचा तुमच्या शरीरावर काहीही फरक पडत नाही. ती हातावर पडलेली चीर हळूहळू सडू लागतो, त्यात इन्फेक्शन होतं, ते इंन्फेक्शन संपूर्ण शरीरभर पसरतं आणि अवघ्या काही दिवसांत त्या साध्या जखमेमुळे मृत्यू होतो.

तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी अतिशयोक्ती सांगितलं जातं आहे. पण तसं नाहीये. जगातील सर्वात नामांकित वैद्यकीय जर्नल 'द लॅन्सेट' आणि जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच जाहीर केलेला अहवाल याविषयी सांगतायेत. येत्या काळात 'अँटीबायोटिक्स' लोकांच्या शरिरावर काम करणं बंद करू शकतं. हे असं का होईल, कशामुळे होईल, कोणाला होईल, याची आकडेवारी काय, संशोधन काय सांगतं, यासाठीचा जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते आणि याचा औषधांचा कोर्स अर्धवट सोडण्याशी काय संबंध आहे असं सगळंच आपण या सकाळ+च्या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com