brain connected to computer
Esakal
पुणे – जगातील महत्त्वाचे शोध लावणारे सायंटिस्ट स्टिफन हॉकिंग हे ना बोलू शकत होते, ना मोठ्या प्रमाणात हालचाली करू शकत होते. पण तरीही त्यांनी विश्वाची सुरुवात कशी झाली यावर अनेक सिद्धांत मांडले. हॉकिंग यांना Amyotrophic Lateral Sclerosis हा गंभीर आजार होता. बोलण्याची आणि हालचाल करण्याची क्षमता जवळजवळ पूर्णपणे गमावल्यानंतरही त्यांनी संगणक आधारित संवाद प्रणालीच्या मदतीने संशोधन सुरू ठेवले. ही प्रणाली कदाचित नसती तर आज त्यांनी लावलेले हे महत्त्वाचे शोधही समोर आले नसते.
नुकतीच २६ ते २९ जून २०२६ दरम्यान फ्रान्समधील पॅरिसमध्ये ‘इंटरनॅशनल ब्रेन-कंप्युटर इंटरफेस सोसायटी मीटिंग २०२६’ ही जागतिक परिषद पार पडली. जगभरातील मोठे न्यूरोसायंटिस्ट, एआय संशोधक आणि तंत्रज्ञान कंपन्या या परिषदेत एकत्र आल्या होत्या. या परिषदेत अनेक महत्त्वाची संशोधनं सादर झाली. त्यामधील महत्वाचे आणि चर्चिले गेलेले संशोधन म्हणजे Meta आणि BCBL या युरोपीय संस्थेने विकसित केलेले 'Brain2Qwerty v2' हे तंत्रज्ञान!
केवळ मनात विचार केला आणि ते स्क्रीनवर टाईप झाले, तेही डोक्याची कोणतीही चीरफाड न करता हे सायन्स फिक्शन चित्रपटात दिसणारे प्रयोग आता प्रत्यक्षात घडले आहेत. पॅरिस परिषदेतून या तंत्रज्ञानाबाबत नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी जगासमोर आल्या आणि यामुळे मानवी जीवनात काय बदल होऊ शकतील, तसेच या तंत्रज्ञानाचे जसे चांगले फायदे आहेत तसेच याचे धोके कोणते आणि यासाठी मेंदूच्या विचारांच्या मालकीवर घाला घातला जाऊ नये यासाठी कोणते कायदे करण्याची मागणी होते आहे, असे कायदे कोणत्या देशाने केले आहेत हे सगळं आपण सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.