Premium|Japan First Female Prime Minister : जपान, जनादेश आणि जोखीम!

Japanese Politics and Leadership : जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाए ताकाईची यांनी ऐतिहासिक बहुमतासह सत्तेवर पकड मिळवली असून, त्यांचा प्रखर राष्ट्रवाद, चीनविरोधी भूमिका आणि 'आयर्न लेडी' प्रतिमेमुळे जागतिक राजकारणात जपानच्या धोरणांची एक नवी आणि आक्रमक दिशा स्पष्ट होत आहे.
Japan First Female Prime Minister

Japan First Female Prime Minister

esakal

Updated on

विनय सहस्रबुद्धे,माजी खासदार

जपानच्या पंतप्रधान ताकाईची यांच्या भावी राजकारणाची दिशा समजून घेण्यासाठी त्यांचे व्यक्तित्व आणि नेतृत्वशैली यांचा विचार करावा लागतो. परंपरावाद, जुन्या जखमांवर फुंकर घालून फुलविलेला राष्ट्रवाद, चीनकडे डोळे वटारत अमेरिकेशी नेत्रपल्लवी आणि ही ‘रेसिपी’ लोकप्रिय करण्यासाठी आत्मनिर्भरतेची फोडणी अशी एक ‘हटके डिश’ त्या शिजवू पाहतायत!

जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाए ताकाईची, फेब्रुवारीच्या प्रथमार्धात त्यांनी घडवून आणलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील त्यांच्या निर्विवाद यशानंतर आता खऱ्या अर्थाने जपानच्या ‘आयर्न लेडी’ म्हणून नावारूपाला येतील अशी चिन्हे आहेत. लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत ताकाईची यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर जानेवारीत अचानक सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. तुलनेने अधिक वयस्कर आणि प्रत्यक्ष कारभारात निष्प्रभ ठरलेल्या आपल्या पुरुष पूर्वसुरींना मागे टाकत या ६४ वर्षीय महिलेने आपल्या ‘लिबरल डेमोक्रेटिक पार्टी’ या पक्षाला जपानच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील ४६५ पैकी ३१६ जागा संपादन करून मजबूत जनादेश मिळवून दिला व सत्तेवरील मांड पक्की केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com