
सुरेेंद्र चापोरकर, अमरावती
अमरावती शहर तसेच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना जोडणारे रस्ते उत्तम झाले आहेत. परंतु लोकसंख्येच्या मानाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. एसटी गाड्यांची झालेली गंभीर स्थिती. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या. शहरातील वाहतूक व्यवस्था, अशा कोणत्याही बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
अमरावतीचे रेल्वेस्थानक मुख्य लोहमार्गावर नसल्याने, येथून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढलेली नाही. ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शाळा किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अतिशय जास्त असतानाही त्या ठिकाणी बसची व्यवस्था अपुरी पडत आहे.