

Marathi Bhasha Gaurav Din and Kusumagraj legacy
esakal
प्रवीण दवणे - dilkhulass@rediffmail.com
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना आत्म्यातून वाटणारी मराठी भाषेबद्दलची खंत दूर करायची असेल; तर आता झडझडून जागृत झाले पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या मराठी भाषेला गतवैभव मिळवून देण्यासाठी, केशवसुतांची तुतारी दशदिशात घुमायला हवी. मराठी हीसुद्धा ज्ञानभाषा व्हावी, हा आग्रह पूर्वीपासूनच आहे; पण त्याबरोबरच उत्तम मराठी आणि त्याबरोबर उत्कृष्ट इंग्रजी असे आपल्याला अध्यापन करता येणार नाही का, याचा विचार साक्षेपाने केला पाहिजे...
मराठी मुले शाळेतून घरी येत नाहीत, ती ‘स्कूल’मधून घरी येतात. ती न्याहारी करत नाहीत, ती ‘ब्रेकफास्ट’ करतात. ती गृहपाठ करत नाहीत, ‘होमवर्क’ करतात. त्यांना शिक्षक शिकवत नाहीत; तर ‘टीचर टीच’ करतात... जिथे काहीच कारण नाही, तिथे परकीय भाषेची लुडबूड कशासाठी?