Premium|Study Room : १९७३ चा ‘प्रोजेक्ट टायगर’ ते आजचे ५८ प्रकल्प; भारतातील व्याघ्र संवर्धनाची यशोगाथा

Project Tiger India Launch 1973 : भारतातील वाढत्या व्याघ्र अधिवासांचे महत्त्व आणि १९७३ पासून सुरू झालेल्या 'प्रोजेक्ट टायगर'ची यशस्वी घोडदौड. जंगलांचे संतुलन राखण्यासाठी देशातील ५८ व्याघ्र प्रकल्पांच्या 'कोर' आणि 'बफर' क्षेत्रांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सविस्तर वेध.
Project Tiger India Launch 1973

Project Tiger India Launch 1973

e

Updated on

लेखक - सुदर्शन कुडचे

प्रस्तावना

भारत हा जगातील सर्वात मोठ्या व्याघ्र अधिवासांपैकी एक मानला जातो. घनदाट जंगले, गवताळ प्रदेश आणि विविध परिसंस्था यांमुळे देशात वाघांसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध आहे. व्याघ्र हा केवळ एक वन्य प्राणी नसून संपूर्ण जंगल परिसंस्थेच्या संतुलनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे व्याघ्रांचे संरक्षण म्हणजे जंगल, जलस्रोत आणि जैवविविधतेचे संरक्षण होय. गेल्या काही दशकांमध्ये जंगलतोड, मानवी हस्तक्षेप आणि शिकारीमुळे वाघांची संख्या कमी होण्याची चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारताने विविध कायदे, प्रकल्प आणि धोरणांच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनाला प्राधान्य दिले.

प्रोजेक्ट टायगर : संवर्धनाचा महत्त्वाचा टप्पा

भारतामध्ये व्याघ्र संवर्धनासाठी १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वाघांचे नैसर्गिक अधिवास संरक्षित करणे आणि त्यांच्या संख्येत वाढ करणे हा होता. सुरुवातीला काही निवडक व्याघ्र प्रकल्पांपासून सुरू झालेली ही मोहीम आज देशभर विस्तारली आहे. सध्या भारतात ५८ व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. या प्रकल्पांमुळे जंगल संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनाला चालना मिळाली आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये कोर क्षेत्र आणि बफर क्षेत्र अशी विभागणी करण्यात आलेली असते. कोर क्षेत्र पूर्णपणे संरक्षित असते आणि तेथे मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असतो. बफर क्षेत्रामध्ये नियंत्रित मानवी क्रियांना परवानगी दिली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com