

Assembly working days report
esakal
कर्नाटक आणि महाराष्ट्र या देशातील प्रमुख राज्यांतील विधानसभांच्या कामकाजाचा अभ्यास ‘पीआरएस’ने केला असून, त्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातील नोंदींनुसार, कर्नाटकात दरवर्षी सरासरी ६० दिवस कामकाज होणे बंधनकारक असतानाही, केवळ ३३ दिवस कामकाज झाले; तर महाराष्ट्रातही वार्षिक २३ दिवसच कामकाज झाले.
महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेमध्ये (२०१९ ते २०२४) १९ अधिवेशने झाली आणि यात १३६ दिवस कामकाज झाले. यामध्ये दरवर्षी सरासरी २७ दिवस कामकाज झाले. तर, २०२४च्या अखेरीस अस्तित्वात आलेल्या १५व्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशनापर्यंत ४० दिवस कामकाज झाले आहेत.