Premium|Human Behavioral Psychology: स्व च्या प्रवासात... या तीन ‘पी’ मध्ये स्वत:ला अडकून देऊ नका..!

Fear of Rejection: तीन ‘पी’च्या सापळ्यात अडकलेल्या मनाचा प्रवास; अटॅचमेंट थिअरी, फॉन रिस्पॉन्स, सोशल व्हॅलिडेशन आणि फिक्स्ड माइंडसेटच्या माध्यमातून स्वतःला ‘गुड इनफ’ मानायला शिकवणारा लेख
Accept yourself as you are

Accept yourself as you are

Esakal

Updated on

पुणे – तिला अचानक खूप मोठ्या संस्थेत नोकरी मिळाली. अचानक तिला मिळालेली ती नोकरी तिच्यासाठी एक ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत गेली. त्यातून तिचं अर्थातच कौतुक होत गेलं. तिला त्या कौतुकाची सवय होत गेली. पण जेव्हा तो बहर ओसरला तेव्हा तिला सतत वाटायला लागलं की, कदाचित आपण मागे पडतोय की काय.. आपलं मत गृहित धरलं जात नाहिये का? ती असुरक्षित झाली आणि तिच्या वरिष्ठांना मी कशी चांगली आहे, मी किती हुशार आहे आणि बाकींच्यापेक्षा मला हे कसं छान जमतं आहे.. असं दाखवू लागली. नंतर नंतर या गोष्टी इतक्या वाढत गेल्या की, आता बाकीच्यांना कळालं होतं की तिचं वागणं हे इतरांना ‘प्लीज’ करणारं आहे.. पण तिला मात्र ते कळत नव्हतं.. तीन ‘पी’ मधल्या एका ‘पी’ मध्ये ती अडकली होती. तिला आता स्वत:ची मतं फार उरलीच नव्हती.. मला काय हवंय, माझं काय मत आहे, मला काय करायचं आहे असा विचार मनात येण्याआधीच इतरांना काय वाटेल, त्यांना मी अधिक हुशार कशी वाटेल आणि यातून मी आणखीन आणखीन शिखरं कशी गाठेन यातंच तिची धन्यता होती. अशा अनेक ती किंवा तो तुम्हाला तुमच्या आजूबाजूला.. कधी तुमच्यातही दिसत असतील.

ज्याला people-pleasing behavior किंवा approval-seeking म्हणतात ते हेच. माणसाला समाजाकडून स्वीकार मिळवण्याची गरज ही निसर्गत:च असते. पण काही लोकांमध्ये ती अत्यंत वाढलेली असते. ते नाही मिळालं तर ती माणसं असुरक्षित होत राहतात.

आजच्या या सकाळ+ विशेष लेखात अशाच तीन ‘पी’ ची आणि त्यामागील मानसशास्त्राची चर्चा करणार आहोत. हे वाटणं आणि वागणं साहजिक असलं तरी ते प्रमाण सोडून असता कामा नये. त्यामुळे यामध्ये न अकडता स्वत:ला यापासून लांब कसं ठेवता येईल जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com