

Purple Potato and Nutritional Security
esakal
श्रद्धा कोळेकर
भारतीयांच्या आहारात बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. भाजी, पराठा, चाट किंवा इतर पदार्थांमध्ये सहज सामावणारा बटाटा प्रामुख्याने ऊर्जेचा स्रोत म्हणून ओळखला जातो. मात्र, याच बटाट्यातून शरीराला आवश्यक असणारी सूक्ष्मपोषक तत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकली, तर? भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने विकसित केलेला कुफरी जामुनिया हा जांभळ्या गराचा बटाटा याच दृष्टीने महत्त्वाचा आहे.
१८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माहितीनुसार, या बटाट्यात सामान्य पिवळ्या गराच्या बटाट्याच्या तुलनेत झिंक, लोह आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक आहे. हा वाण २०२४ मध्येच अधिकृतरीत्या प्रसारित झाला होता. त्यामुळे हा अगदी नवा शोध नसला, तरी पोषणसुरक्षेच्या संदर्भात त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.