Premium| Q-Day Explained : तिसऱ्या महायुद्धाचा ‘क्यू-डे’! क्वांटम कॉम्प्युटरमुळे जगातील बँकिंग आणि इंटरनेट धोक्यात आहे का?

Third World War Warning : एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सायबर हल्ल्यांमुळे जगासमोर नव्या प्रकारच्या युद्धाचे संकट निर्माण झाले आहे. ‘क्यू-डे’च्या दिवशी शक्तिशाली क्वांटम कॉम्प्युटर्स आजच्या इंटरनेट, बँकिंग आणि डिजिटल सुरक्षेला मोठा धोका निर्माण करू शकतात
Q-Day Explained

Q-Day Explained

esakal

Updated on: 

आज संपूर्ण जग एका अदृश्य, पण महाभयंकर संकटाच्या छायेत आहे, ज्याला सायबर सुरक्षेच्या भाषेत ‘क्यू-डे’ म्हटले जाते. ‘क्यू-डे’ म्हणजे असा दिवस, जेव्हा ‘क्रिप्टोग्राफिकली रेलिव्हंट क्वांटम कॉम्प्युटर्स’ इतके प्रगत होतील, की ते आजच्या इंटरनेट आणि बँकिंग व्यवस्थेला सुरक्षित ठेवणारी सर्व ‘पब्लिक-की एन्क्रिप्शन’ यंत्रणा सहज उद्ध्वस्त करू शकतील. हनी ट्रॅप, स्मगलिंग, सायबर हल्ले आणि ‘क्यू-डे’चे हे अदृश्य युद्ध एका सर्वनाशक संघर्षात झाल्याशिवाय राहणार नाही, असेच दिसते आहे...

‘एनव्हिडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेला राजीनामा हा केवळ जागतिक शेअर बाजाराला बसलेला धक्का नव्हता; तर आधुनिक भू-राजकीय रणभूमीवरील अत्यंत भयंकर वास्तवाची उकल होती. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रांतीच्या या शिल्पकाराची गच्छंती कोणत्याही तांत्रिक चुकीमुळे नाही, तर शीतयुद्धाच्या काळातील हेरगिरीच्या थरारक कथांनाही लाजवेल अशा एका प्रकरणामुळे झाली. सिंगापूरस्थित ‘मेगास्पीड’ या कंपनीतील हुआंग लीसोबतचे त्यांचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यानंतर, अमेरिका आणि तैवानच्या गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि जगाला हादरा देणारी धक्कादायक माहिती समोर आली. अ‍ॅलिसचा वापर चीनने ‘हनी ट्रॅप’ म्हणून केल्याचा दाट संशय आहे. जेन्सन यांच्या जवळिकीचा फायदा घेत अब्जावधी डॉलरचे एआय सर्व्हर्स चोरट्या मार्गाने चीनमध्ये वळवण्याचे काम या माध्यमातून झाल्याचे मानले जात आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची पहिली ठिणगी आहे, एक असे युद्ध जे पूर्णपणे आभासी, कृत्रिम आणि कल्पनेपलीकडे वेगवान असेल.

Loading content, please wait...