Premium|Quad Alliance and China : क्वाडचा पोपट जिवंत आहे

Quad Alliance and Indo Pacific Strategy : अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या क्वाड समूहाची मनिलातील बैठक पार पडली. मात्र चीनला रोखण्याचे उद्दिष्ट, ट्रम्प यांची चीनविषयक भूमिका आणि भारताची व्यूहात्मक स्वायत्तता यांमुळे या समूहाच्या भविष्यासमोर प्रश्न कायम आहेत.
Quad Alliance and Indo Pacific Strategy

Quad Alliance and Indo Pacific Strategy

esakal

Updated on: 

श्रीराम पवार- shriram1.pawar@gmail.com

फलिपिन्समधील मनिला येथे अखेर क्वाड नेत्यांची बैठक झाली. अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा हा समूह नेमका कोणत्या दिशेने जाणार याची निश्चिती ही कल्पना पुढे आली तेव्हा म्हणजे २००७ पासून झालेली नाही.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात क्वाड हे मागं पडलेलं प्रकरण होतं अशा स्थितीत चार देशांचे नेते भेटले एकत्र छायाचित्र काढले, संयुक्त निवेदन जाहीर झाले हेही कमी नाही असं राजनयाच्या भाषेत म्हणायची सोय नक्कीच आहे. मात्र ज्या चीनला रोखणं हे क्वाडचे प्रमुख उद्दिष्ट्य त्या दिशेने यावेळीही फार काही घडलं नाही. ते घडण्याची शक्यताही नव्हती, याचे कारण क्वाडच्या बैठकीनंतर लगेचच ट्रम्प चीनमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेणार होते. तेव्हा क्वाडचा पोपट मेला नाही इतका संदेश दिला गेला. कमालीच्या अस्थिरतेच्या जागतिक वातावरणात तेही यशच म्हणायचं.

क्वाड हा चतुष्कोन इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे आणि जागतिक रचनेला आकार देण्याची क्षमता असलेले एकत्रीकरण म्हणून पाहिलं जात होतं. याचं कारण या क्षेत्रात या चतुष्कोनात सहभागी असलेले भारत, जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे चार देश निरनिराळ्या कोनांवर आहेत. त्यांच्याकडे मिळून या क्षेत्रात प्रभाव टाकण्याची क्षमता प्रचंड आहे. हा सारा खटाटोप सुरू होण्यामागे चीनचे वाढते सामर्थ्य हे कारण होते. चीनचा जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेच्या पुढाकाराने समावेश झाला आणि त्यानंतर चीनने जी अफाट प्रगती केली ती अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारी बनली. मुद्दा केवळ अमेरिकेशी स्पर्धेपुरता नव्हता आणि नाही तर चीनचे इरादे जगभर प्रभाव टाकण्याचे, त्याचा परिमाण म्हणून भवताली अस्वस्थता निर्माण करणारे होते. चीनने ज्या प्रकारे आर्थिक विकास केला आणि सोबत आपले लष्करी सामर्थ्य वाढवले ते पाहता चीनला रोखता येण्याची एक शक्यता इंडो पॅसिफिक क्षेत्रात आहे. तिथे क्वाडमध्ये सहभागी चार देश एकत्र येऊन व्यूहात्मक भागीदारी करतील तर चीनला या क्षेत्रात शह देता येईल हे यामागचे गणित.

Loading content, please wait...