
डॉ. संजय ढोले
संयुक्त राष्ट्रांनी पुंजकीय विज्ञान अथवा क्वांटम मेकॅनिक्स या संकल्पनेला किंवा शोधाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल चालू वर्ष हे वर्ष पुंजकीय विज्ञान व तंत्रज्ञानवर्ष म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. पुंजकीय विज्ञानाचे जागतिक बिगुल आता भारतातही वाजायला सुरुवात झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी पुंजकीय विज्ञान अथवा क्वांटम मेकॅनिक्स या संकल्पनेला, विकासाला किंवा शोधाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल चालू वर्ष हे वर्ष पुंजकीय विज्ञान व तंत्रज्ञानवर्ष म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
वर्नर हायजेनबर्ग या जर्मन शास्त्रज्ञाने पुंजकीय विज्ञान रुजविणारा पहिला संशोधननिबंध १९२५-२६ मध्ये प्रकाशित केला होता. हा निबंध सूक्ष्म व अतिसूक्ष्म शास्त्रातील घडामोडींसाठी एक वेगळे दालन शास्त्रीयजगतात उघडण्यास कारणीभूत ठरला.