Premium|Rahul Gandhi : वादळी चर्चेच्या केंद्रस्थानी विरोधी पक्षनेता

Rahul Gandhi Lok Sabha membership cancellation 2026 : राहुल गांधींच्या आक्रमकतेमुळे मोदी सरकारला संसदेत अडचणींचा सामना करावा लागतो. लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या वर्तनामुळे काँग्रेसमध्ये असंतोष वाढला आहे. मोदी सरकारला राहुल गांधींना नियंत्रित करण्याची कठीण तयारी आहे.
Rahul Gandhi Lok Sabha membership cancellation 2026

Rahul Gandhi Lok Sabha membership cancellation 2026

esakal

Updated on

सुनील चावके - ‘सकाळ’च्या दिल्ली ब्यूरोचे प्रमुख

संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वार्धात नेहमीसारखे वर्चस्व गाजविण्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळू शकले नाही. सत्ताधाऱ्यांची सारी ऊर्जा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आक्रमक पवित्रे निष्प्रभ करण्यातच खर्ची पडली.

तापलेल्या वातावरणात संपलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वार्धाइतकाच मार्च महिन्यापासून सुरु होणारा उत्तरार्धही तेवढाच संघर्षपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत. तेरा दिवसांच्या पूर्वार्धात संसदेवर नेहमीसारखे वर्चस्व गाजविण्यात सत्ताधारी भाजप-रालोआला यश मिळू शकले नाही. सत्ताधाऱ्यांची सारी ऊर्जा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आक्रमक पवित्रे निष्प्रभ करण्यातच खर्ची पडली. मोदी सरकारला वेठीस धरण्यासाठी राहुल गांधी यांच्या हाती तीन मुद्दे लागले आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘अप्रकाशित’ पुस्तकातील चीनच्या आक्रमणासंबंधातील वादग्रस्त उतारा, अमेरिकेला झुकते माप देणारा भारत-अमेरिका व्यापार करार आणि जेफ्री एप्स्टीनच्या जाळ्यात अडकलेले केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी. हे तिन्ही वादग्रस्त आणि भाजपसाठी त्रासदायक ठरलेले मुद्दे राहुल गांधी एकट्यानेच उपस्थित करीत असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपची कोंडी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com