Premium|Indian Mythological Cinema : दूरदर्शनवरील रामायण ते आयमॅक्सचा पडदा; भारतीय सिनेमाची जागतिक झेप किती मोठी?

Indian Mythological Cinema : १९८७ मध्ये घराघरांत पोहोचलेले रामायण आता हजारो कोटींच्या भव्य निर्मितीतून आयमॅक्सच्या पडद्यावर येत आहे. भारतीय संस्कृती, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक सिनेसृष्टीतील महत्त्वाकांक्षेचा हा नवा प्रवास आहे.
Indian Mythological Cinema

Indian Mythological Cinema

esakal

Updated on: 

किशोर अर्जुन - sakal.avtaran@gmail.com

१९८७ मध्ये दूरदर्शनवर रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका प्रसारित होत असताना देशात एकदम अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण होत असे. सगळे रस्ते ओस पडत, संपूर्ण गल्लीत किंवा परिसरात असलेल्या एखाद-दुसऱ्या कृष्णधवल दूरचित्रवाणीसमोर परिसरातील जवळपास कुटुंबे एकत्र येत आणि त्या छोट्या पडद्यावरील पात्रांकडे कलाकार म्हणून नव्हे; तर श्रद्धेच्या भावनेतून पाहिले जात होते. जवळपास चार दशकांनंतर आज तेच रामायण हजारो कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी निर्मितीच्या माध्यमातून आयमॅक्सच्या मोठ्या पडद्यावर जागतिक प्रेक्षकांसमोर आणण्यात आले आहे. अर्थात या दोन टप्प्यांतील आणि ४० वर्षांतील अंतर म्हणजे केवळ तंत्रज्ञानातील प्रगती नाही. भारतीय समाजाच्या सांस्कृतिक आकांक्षांमध्ये, सिनेमा माध्यमाच्या क्षमतेमध्ये आणि भारतीय सिनेउद्योगाच्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षेत झालेला बदलही आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ हा या बदलाचा महत्त्वाचा टप्पा मानता येऊ शकेल. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका, डीएनईजी या आंतरराष्ट्रीय व्हिज्युअल इफेक्ट्स संस्थेचा सहभाग आणि ए. आर. रहमान व हान्स झिमर यांचे संगीत यामुळे या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच मोठे लक्ष वेधले होते. दोन भागांत सादर होणारा हा प्रकल्प केवळ भारतीय पौराणिक कथेचे आधुनिक रूपांतर नाही; तर भारतीय सिनेसृष्टी जागतिक मनोरंजन उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी किती मोठी आर्थिक आणि तांत्रिक जोखीम स्वीकारण्यास तयार आहे, याचेही उदाहरण म्हणून बघता येईल.

Loading content, please wait...