
डॉ. रवींद्र उटगीकर
एकविसाव्या शतकातील जगाच्या गरजांपैकी तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, औषधनिर्मिती आणि शस्त्रनिर्मिती यांमध्ये दुर्मीळ खनिजांची भूमिका महत्त्वाची ठरू लागली आहे. त्यांचा साठा आढळणारे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांवर प्रक्रिया करू शकणारे देश जगाच्या अर्थपटलावर स्वतःचे भक्कम स्थान निर्माण करू शकतील.