Premium|Ratnakar Monthly Magazine 1926 : ... पहाटवेळ महाराष्ट्रात सुंदर दिसते

Marathi Literature Classics : शंभर वर्षांनंतर 'रत्नाकर' मासिकाचे पुनरागमन; ना. सी. फडके यांच्या ऐतिहासिक साहित्याचा वारसा नव्या पिढीसाठी सुनिधी पब्लिशर्सतर्फे पुनर्प्रकाशित, मराठी साहित्यविश्वातील एका सुवर्णयुगाची शताब्दी साजरी करत जुन्या स्मृतींना उजाळा देणारा स्तुत्य उपक्रम.
Marathi Literature Classics

Marathi Literature Classics

esakal

Updated on

हृदयनाथ मंगेशकर-saptrang@esakal.com

गुरुजींच्या घरातून निघालेल्या दीनानाथ यांना मंगेशीच्या देवळात जायला बराच वेळ लागला. वाटेत त्यांना भेटलेल्या पंडितजींनी बरेच काही सांगितले. कोण होते हे पंडितजी. साऱ्या गोष्टींचा उलगडा करत आहेत पंडितजी या भागात...

आम्ही सळसळणाऱ्या पिंपळपानाच्या

झाडाखाली उभे होतो.

समोर मंगेशी गाव, श्रीमंगेशाचे मंदिर,

धूसर, धूसर दिसत होते.

मी आनंदाने पंडितजींना म्हणालो.

‘‘धन्यवाद पंडितजी ! तुम्ही नसता तर मी

आज इथेच डोंगरावर चकरा मारत बसलो

असतो, पण फार उशीर झालाय.

घरी वाट बघत असतील, आता मी मंगेशीला निघतो,

पण आपण कुठे जाणार आहात ?’’

‘‘मी तुला मंगेशीला सोडतो आणि आज

मीही मंगेशीलाच राहण्याचा विचार करतोय.’’

पंडितजींचा आवाज आला, पण अस्पष्ट,

अगदी दुरून आणि मी त्यांच्याकडे गोंधळून

पाहिले, तर पंडितजी अस्पष्ट म्हणजे, जणू

न दिसणारेच वाटत होते. पाठच्या पिंपळ

पानांची सळसळ स्तब्ध होती. सगळीकडे

अचानक निरव शांततेचा, निरव नाद ऐकू

येत होता. शांततेला, स्तब्धतेला, निर्ध्वनीतेला

एक अनाम, अजीब नाद, आवाज. स्वर रव,

स्पर्शध्वनी असतो. तो ऐकू येत नाही. पण

सर्वांगाला हलकासा लपेटतो. बिलगतो.

‘‘तो बोल मंद हळवासा

आयुष्य स्पर्शूनी गेला ’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com